- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहर हे खाडीवर वसलेले शहर आहे. डोंगराळ भागातील पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. नाले आणि होल्डिंग पॉण्डमध्ये वाढलेली खारफुटी ही गाळ काढण्याच्या कामात मोठी अडचण ठरत आहे. खारफुटीसारख्या विविध कारणांमुळे शहरातील या नाल्यांच्या प्रवाहामधील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात आलेला नाही. यामुळे नाल्यामधून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून शहरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.नवी मुंबई शहराची रचना ही साधारण एका बाजूला खाडी आणि दुसºया बाजूला डोंगर अशी आहे. डोंगराळ भागाला लागून एमआयडीसी क्षेत्र आहे, तर खाडी भागाच्या नजीक नागरी वसाहती आहेत. डोंगराळ भागातील पावसाळी पाण्याचा निचरा होणारे सुमारे ७४ नैसर्गिक नाले असून, समुद्राला येणाºया भरती काळात शहरात पाणी शिरू नये यासाठी शहरात होल्डिंग पॉण्ड बनविण्यात आले आहेत.शहरातील या नाल्यांमध्ये प्रामुख्याने नेरु ळ मधील वंडर्स पार्क, हार्डेलिया, जुईनगर रेल्वेस्थानक, अरेंजा कॉर्नर वाशी, सेक्टर ११ कोपरखैरणे, सेक्टर ६ व ७ घणसोली, घणसोली गाव, ऐरोली, यादवनगर, ऐरोली एमआयडीसी, दिघा, आंबेडकरनगर रेल्वेलाइन जवळील नाला, असे एकूण १७ नाले होल्डिंग पॉण्डला मिळालेले असून हे नाले म्हणजे शहराची लाइफलाइन म्हणून समजले जातात. यामधील काही नाल्यांची लांबी ४०० मीटर तर काही नाल्यांची लांबी सात किलोमीटर एवढी आहे. सर्व महत्त्वाच्या नाल्यांची एकूण लांबी साधारण ७८ किलोमीटर इतकी आहे.नाल्यांमधून डोंगराळ भागातील पावसाळी पाण्याबरोबर एमआयडीसी भागातील कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेले जाते. नाल्यांमधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर होल्डिंग पॉण्डमध्ये गाळ येत असून भरतीच्या वेळीही खाडीमधून होल्डिंग पॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ येतो, तसेच होल्डिंग पॉण्डमध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक नाल्यांचे काँक्र ीटीकरण झाले नसल्याने नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपेही वाढली आहेत.अनेक ठिकाणी नाल्यांशेजारी डेब्रिजमाफियांनी डेब्रिजचा भराव टाकल्याने नाल्यांचा आकार कमी झाला असून, पावसाळ्यात नाल्यांच्या शेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात महापालिकेच्या माध्यमातून या नाल्यांमधून वाहणाºया पाण्यातील काही प्रमाणावर अडथळे दूर केले जातात; परंतु खारफुटीमुळे नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढला जात नाही, त्यामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून भविष्यात शहरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.>स्वच्छता विभागाकडून नाल्यांची स्वच्छताखाडीवर वसलेल्या शहरातील नाले, होल्डिंग पॉण्ड, खारफुटी आदीच्या कामासाठी महापालिकेकडे पर्यावरण अभियांत्रिकी अधिकारी असणे गरजेचे आहे; परंतु महापालिकेत या दर्जाचा अधिकारी नाही. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात शहरातील अंतर्गत गटारे स्वच्छ करणाºया स्वच्छता विभागाकडेच शहरातील प्रमुख नाल्यांच्या स्वच्छतेचे काम देण्यात येते. यामध्ये नाल्यांचा संपूर्ण प्रवाह स्वच्छ न करता फक्त ठरावीक ठिकाणचे अडथळे दूर करण्यात येतात.>संरक्षक भिंत बांधण्याची मागणीसुरक्षेच्या दृष्टीने दिघा, ऐरोली, इंदिरानगर व इतर ठिकाणच्या नाल्यांना संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली आहे; परंतु केंद्र शासनाकडून नाला व्हिजन राबविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार देण्यात आले आहे.>खारफुटीचा प्रभाव होल्डिंग पॉण्डवर मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबतचे प्रकरण न्यायालयात असून गाळ काढण्यासाठी परवानगी मागणार आहोत. इतर नाल्यांमध्ये किती प्रमाणावर खारफुटी आहे, ते पाहावे लागेल. काही अडथळा नसल्यास त्या टप्प्याटप्प्यातील नाल्यांचे काँक्र ीटीकरण करण्यात येत आहे. खारफुटीमुळे सर्व नाल्यांचे काँक्र ीटीकरण झाले नाही आणि सर्व नाले एकत्रित काँक्र ीटीकरण करणेही मोठे खर्चिक आहे. जेएनयूआरएम असताना याबाबत बजेट काढण्यात आले होते ते सुमारे ६०० कोटी रु पयांच्यावर होते. आर्थिक आणि इतर अडचणी पाहूनच या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.- डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त
नाला व्हिजनच्या मार्गात खारफुटीचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:00 AM