मल्टिप्लेक्समध्ये खिशाला कात्री कायम; आंदोलनाचाही परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:33 AM2018-08-03T03:33:02+5:302018-08-03T03:33:19+5:30

मल्टिप्लेक्समध्ये १ आॅगस्टपासून सवलतीमध्ये खाद्यपदार्थ व शीतपेय मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट व तिप्पट दराने वस्तूंची विक्री केली जात आहे.

In the multiplexes, the scissors continue; There is no result of the agitation | मल्टिप्लेक्समध्ये खिशाला कात्री कायम; आंदोलनाचाही परिणाम नाही

मल्टिप्लेक्समध्ये खिशाला कात्री कायम; आंदोलनाचाही परिणाम नाही

googlenewsNext

- वैभव गायकर, अनंत पाटील

पनवेल : मल्टिप्लेक्समध्ये १ आॅगस्टपासून सवलतीमध्ये खाद्यपदार्थ व शीतपेय मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट व तिप्पट दराने वस्तूंची विक्री केली जात आहे. व्यवस्थापनाकडून खिशाला कात्री लावली जात असल्यामुळे प्रेक्षकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील बालाजी मल्टिप्लेक्स सिनेमागृहात ६५० मि.ली.च्या कोकसाठी १५० रु पये, पॉपकॉर्न- १७० रु पये, सामोसे- ८० रु पये, पाण्याची सीलबंद बाटली - ६० रु पये, रेडबुल - १४० रु पये व आईस्क्र ीम बाहेरील बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने विकले जात आहेत. सर्वच खाद्यपदार्थ जवळपास तिप्पट दराने विकले जातात. सिनेमागृहामध्ये पाणी घेऊन जाण्यास सवलत देण्यात आली आहे.
वाशी रेल्वे स्थानकासमोरील रघुलीला मॉलमध्ये आयनॉक्स मल्टिप्लेक्सची सहा सिनेमागृहे आहेत. येथे परिस्थिती जाणून घेतली असता, ३०० मि.ली. च्या थंडपेय कोकसाठी - १५० रु पये, पॉपकॉर्न- १५० रु पये, सामोसे- ५० रु पये, पाण्याची एक लीटर सीलबंद बाटली - ६० रु पये, रेडबुल एमआरपी नुसार - १४० रु पये, नाचोस - २२० रु पये बटाटावडा - १२० रु पये, चहा आणि कॉफीच्या एका कपसाठी प्रत्येकी १३० रु पये दर आहे. वाशी पाम बीच येथील आयनॉक्समध्येही याचपद्धतीने जादा दर आकारले जात आहेत. आईस्क्र ीम बाहेरील बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने विकले जात आहे.
राज्य शासनाने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, तसा प्रयत्न करणाºयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. यापुढे मल्टिप्लेक्समधील महागडे पदार्थ घेण्याची गरज भासणार नाही. बाहेरून घेतलेले पदार्थदेखील मल्टिप्लेक्समध्ये नेता येतील आणि या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार, १ आॅगस्टपासून होणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र, नवी मुंबईतील मल्टिप्लेक्स सिनेमागृहात गेल्यानंतर बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यास बंदी केली असून, दरही कमी करण्यात आले नसल्याचे प्रेक्षकांच्या निदर्शनास आल्याने प्रेक्षकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय यंत्रणा या दरांवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरली आहे.

खारघर, पनवेलमध्ये मनमानी
पनवेलमधील पीव्हीआर चित्रपटगृहातही बाहेरील खाद्यपदार्थ आतमध्ये नेऊ दिले जात नव्हते. या विषयी प्रतिक्रिया विचारली असता व्यवस्थापनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आम्हाला संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे या चित्रपटगृहांचे म्हणणे होते. खारघर शहरातील लिटिल वर्ल्ड मॉलमधील कार्निवल सिनेमागृहातही हीच अवस्था आहे.
चित्रपट पाहण्यासाठी येणाºया प्रेक्षकांचीही यामुळे घोर निराशा झाली आहे. या निर्णयासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असून, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चित्रपटगृहामध्ये विविध ब्रँडचे पदार्थ विक्र ीसाठी ठेवले जात असतात. पॉपकॉर्न, चहा, कॉफी, आईस्क्र ीम, सामोसे आदीच्या किमतीत कोणत्याच बदल करण्यात आलेला नाही.

पूर्वीपेक्षा आमच्या बालाजी मल्टिप्लेक्सने खाद्यपदार्थांचे दर कमी केलेले आहेत. बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमागृहात आणण्यास आणि खाण्यास मनाई आहे. उच्च न्यायालयाकडून लेखी आदेश आल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- मनी राजू, मालक, बालाजी मल्टिप्लेक्स, कोपरखैरणे

सरकारने बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात सोबत घेऊन जाण्याची जरी घोषणा केली, तरीसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. पनवेलमधील पीव्हीआर सिनेमागृहात आम्हाला बाहेरील खाद्यपदार्थ आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला.
- किशोर मदने, प्रेक्षक

Web Title: In the multiplexes, the scissors continue; There is no result of the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल