मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:33 PM2022-07-14T12:33:51+5:302022-07-14T12:34:15+5:30

मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, राणे यांनी व्यक्त केले मत.

Mumbai accounts for 34 percent of the countrys finances says Union Minister Narayan Rane | मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

googlenewsNext

नवी मुंबई : गेल्या ७५ वर्षात मराठी उद्योजकांची आर्थिकदृष्ट्या किती प्रगती झाली, हा आता संशोधनाचा विषय आहे. मुंबई ही संपूर्ण देशाचा ३४ टक्के आर्थिक भार घेते. त्यामुळे मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशी येथे मराठी उद्योजक दिनी केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवार, १२ जुलै रोजी सायंकाळी मराठी उद्योजकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.

यावेळी मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांची चित्रफित दाखविण्यात आली. एव्हिट्रिक मोटर्स प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील, माने ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या संग्राम पाटील, डॉ.राजाराम पाटील आणि सुधीर राणे या मराठी उद्योजकांचा नारायण राणे यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. 

Web Title: Mumbai accounts for 34 percent of the countrys finances says Union Minister Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.