नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी ७०७ वाहनांची आवक झाली. यामध्ये ३,८२८ टन भाजीपाला व साडेसात लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.माथाडी कामगारांनी १४ डिसेंबरला बाजार समिती बंदचे आवाहन केले आहे. रविवारी सुट्टी व सोमवार बंद, यामुळे दोन दिवस सलग मार्केट बंद राहणार आहे. या दरम्यान, मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शनिवारी आवक वाढविण्यात आली होती. भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल ७०७ वाहनांची आवक झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा व इतर राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला. मध्यरात्रीपासून ते शनिवारी दुपारपर्यंत मार्केटमधून मुंबईत भाजीपाला विक्रीसाठी जात असल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहावयास मिळत होते. आवक जास्त असल्यामुळे काही वस्तूंचे दर काही प्रमाणात कमी झाले हाेते.कांदा, बटाटा मार्केटमध्ये २०० ट्रेक व टेम्पोमधून १,७७७ टन कृषिमाल विक्रीसाठी आला होता. फळ मार्केटमध्ये ३१७, मसाला मार्केटमध्ये १३१ व धान्य मार्केटमध्ये २१६ वाहनांमधून कृषी माल आला होता.
मुंबई बाजार समितीमध्ये झाली भाजीपाल्याची विक्रमी आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 1:45 AM