नवी मुंबई : तुर्भे येथील झोपडपट्टी परिसरात पालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. त्याठिकाणी पालिकेतर्फे पाण्याच्या नळाला जोडलेल्या मोटारवर कारवाई सुरु होती. यावेळी कारवाईला विरोध करत ५ ते १० जणांच्या जमावाने पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केली.नळाला जोडलेल्या मोटार काढण्याचे काम पालिकेच्या पथकामार्फत सुरु होते. त्यानुसार कारवाईदरम्यान परिसरातील ३५ मोटार पालिकेतर्फे जप्त करण्यात आल्या. दरम्यान, कारवाई सुरु असतानाच ५ ते १० जणांच्या जमावाने पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करुन नळावरील मोटार काढण्यास विरोध केला. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पालिका कर्मचाऱ्याला मारहाण
By admin | Published: February 20, 2017 6:28 AM