शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महापालिकेने हटवले १६,००० बॅनर्स

By admin | Published: January 08, 2017 2:54 AM

महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे.

- वैभव गायकर,  पनवेलमहापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे. अनधिकृत पत्राशेड, बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप झाले होते. यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकही हैराण झाले होते. मात्र, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यासंदर्भात पालिका स्थापनेपासून स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर पालिका हद्दीतील १६ हजार अनधिकृत बॅनर्स व सुमारे २३०० दुकानांतील पत्राशेड हटवून पनवेलचा श्वास मोकळा केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात पनवेल शहरात ५३१, नवीन पनवेलमध्ये १३२५, खांदा वसाहतीत ४७० जणांना महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. त्यांनतर आयुक्तांनी धडक कारवाई मोहीम हातात घेतली. यात सिडको नोडचाही समावेश आहे. आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारताच येथील दुकानदारांनी अतिरिक्त वाढविलेली पत्राशेड स्वत: काढून घेतली. पनवेलच्या इतिहासात आजपर्यंत एवढी मोठी कारवाई झाली नसल्याने शहरातील नागरिकांनी याचे स्वागत केले. विशेष म्हणजे पनवेलपासून ते खारघरपर्यंत तब्बल १६ हजार बॅनर्स काढून काहीजणांवर गुन्हे दाखल केल्याने अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग बाजीला आळा बसला. आयुक्तांची ही मोहीम आणखी तीव्र होणार आहे. प्रत्येक शहरात आठवडा बाजार भरतो. मात्र, या आठवडा बाजारातून गैरमार्गाने पैसे वसूल करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्यांनतर अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या अतिक्र मण मोहीम पथकात १५ ते १७ कर्मचारी, २ गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. पनवेलमध्ये वर्षानुवर्षे पदपथ, रस्ते याठिकाणी सुरु असलेले अतिक्र मण हटविल्याने शहरात प्रवेश करताना सर्वानाच सुखद अनुभव येत आहे. अनधिकृत हातगाड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी याबाबतदेखील मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे.