पालिकेचे मुकादम निलंबित

By admin | Published: August 19, 2015 02:22 AM2015-08-19T02:22:36+5:302015-08-19T02:22:36+5:30

पनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या चांगलाच

The municipal corporation suspended | पालिकेचे मुकादम निलंबित

पालिकेचे मुकादम निलंबित

Next

प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल नगरपालिकेतील धाकटा व मोठा खांदा येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांना गटारीच्या दिवशी वेळेआधी सोडण्याचा निर्णय दोन मुकादमांच्या चांगलाच अंगलट आला आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी अचानक दिलेल्या भेटीत एकही कामगार न आढळल्याने त्यांनी मुकादमांना निलंबित केले. त्याचबरोबर एकूण तेवीस कामगारांवर एक दिवस विनावेतनाची कारवाई केली आहे.
पालिकेच्या हद्दीतील पनवेल शहर, तक्का, धाकटा आणि मोठा खांदा या परिसरांची साफसफाई करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. एकूण क्षेत्रफळ त्याचबरोबर कामगारांची संख्या यामध्ये प्रचंड तफावत आहे. पालिकेच्या सफाई कामगारांनी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत काम करणे अपेक्षित आहे. मात्र कित्येकजण कामचुकारपणा करतात. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडून आरोग्य धोक्यात येत आहे. मुख्याधिकारी मंगेश चितळे आणि अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी पदभार घेतल्यापासून दांडी, लेटलतिफ त्याचबरोबर मधूनच गुल होणाऱ्या कामगारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. विशेषत: पालिकेपासून धाकटा आणि मोठा खांदा दूर असल्याने तेथील सफाई कामगार पूर्णवेळ काम न करता मधूनच पळ काढत असल्याच्या अनेकदा तक्र ारी येत होत्या. यात मुकादमांचे साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
१४ आॅगस्टला अतिरिक्त मुख्याधिकारी चारूशीला पंडित यांनी या दोन्ही ठिकाणी अचानक भेट दिली. त्यावेळी येथे सफाई कामगार काम करताना आढळले नाही. त्याचबरोबर मुकादम व सहाय्यक मुकादमही बेपत्ता होते. पंडित यांनी त्वरित आरोग्य सभापती गणपत म्हात्रे यांना कळवले असता, मुकादमाने गटारीकरिता कामगारांना सोड़ून दिल्याची माहिती मिळाली. एकूण २३ कामगारांना त्या दिवशीचे वेतन न देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. मुकादम सूर्यभान काळे आणि सहाय्यक मुकदाम संतोष गायकवाड यांना निलंबित केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: The municipal corporation suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.