राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी महापालिकेचे एक लाख ६७ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

By योगेश पिंगळे | Published: February 14, 2024 04:31 PM2024-02-14T16:31:17+5:302024-02-14T16:33:15+5:30

महापालिकेच्या माध्यमातून शहरात जनजागृती.

municipal corporation's target of one lakh 67 thousand beneficiaries for national deworming campaign in navi mumbai | राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी महापालिकेचे एक लाख ६७ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी महापालिकेचे एक लाख ६७ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

योगेश पिंगळे, नवी मुंबई : सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी हि संजीवनी असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते. यंदा राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम १३ फेब्रुवारी व मॉप अप दिन २० फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. सदर मोहिमेकरीता महानगरपालिकेचे एक लाख ६७ हजार ७९९ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असून याकरिता सर्व नियोजन केले आहे.

१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा लाभार्थ्यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे,पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंत नाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणे ही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. 

या अनुषंगाने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सभा घेऊन एएनएम, आशा, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे समन्वयक आदी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून अभियानाची जनजागृती करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना जंतनाशक गोळी देऊन कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करून उत्तम आरोग्य ठेवणे व पोषण स्थिती आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Web Title: municipal corporation's target of one lakh 67 thousand beneficiaries for national deworming campaign in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.