मानापमानाच्या नाट्याने गाजली पनवेलची महासभा , महापालिका प्रशासनावरही नगरसेवकांचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:42 AM2017-09-20T02:42:00+5:302017-09-20T02:42:04+5:30

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी वासुदेव बळवंत नाट्यगृहात पार पडली. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत ही महासभा सुरू झाली. दुपारी २ वाजता सुरू झालेली ही सभा मानापमानाच्या नाट्यातच गाजली.

Municipal councils of Panvel, Manasuman's plays, municipal councils on municipal administration | मानापमानाच्या नाट्याने गाजली पनवेलची महासभा , महापालिका प्रशासनावरही नगरसेवकांचे ताशेरे

मानापमानाच्या नाट्याने गाजली पनवेलची महासभा , महापालिका प्रशासनावरही नगरसेवकांचे ताशेरे

Next

वैभव गायकर।
पनवेल : पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी वासुदेव बळवंत नाट्यगृहात पार पडली. महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत ही महासभा सुरू झाली. दुपारी २ वाजता सुरू झालेली ही सभा मानापमानाच्या नाट्यातच गाजली.
विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रशासन इतिवृत्तात घेत नाही आणि तेच विषय पुढच्या महासभेच्या सत्ताधाºयांच्या नावानी नोंद केले जात असल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला. सत्ताधाºयांनी महापालिकेच्या लोगोच्या अनावरणच्या कार्यक्र माला आमदारांना निमंत्रण दिले नसल्याने बराच वेळ गोंधळ घातला. या मानापमानाच्या नाट्यात बराच वेळ वाया गेला.
विरोधीपक्षाचे सदस्य हरेश केणी, गुरु नाथ गायकर, अरविंद म्हात्रे, अजीज पटेल, प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, बबन मुकादम हे जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहाबाहेर पडले. महापालिका प्रशासनाच्या वतीने विश्वासात घेतले जात नाही, तसेच उपस्थित प्रश्नांची दखल घेतली जात नाही. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असे गंभीर प्रश्न इतिवृत्तात समाविष्ट केले जात नसून, सत्ताधारी आम्ही मांडलेले प्रश्न कॉपी करीत असल्याचा आरोप या वेळी विरोधकांनी केला. शेकापचे गटनेते प्रीतम म्हात्रे यांनीही सत्ताधाºयांवर विषय चोरले जात असल्याचे आरोप केले.
पनवेल महापालिकेच्या लोगोच्या अनावरण कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना आमंत्रित केले नसल्याने भाजपाचे गटनेते परेश ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. पनवेल महापालिकेच्या लोगोच्या अनावरणासंदर्भात आयोजित कार्यक्रमाची कोणतीच माहिती पालिका प्रशासनाने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल महापालिका प्रशासन कोणतेही कार्यक्र म आयोजित करीत असताना सत्ताधाºयांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, जगदीश गायकवाड यांनी पालिकेच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल महापालिकेच्या उभारणीला मोठे योगदान असल्याचे बिनेदार यांनी सांगितले. या वेळी आयुक्तांनी सारवासारव करीत पालिका प्रशासनातर्फे सर्वांनाच या कार्यक्र माचे आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले.
पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अनेक समस्याच भेडसावत असताना सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेळकाढू धोरणामुळे महत्त्वाच्या प्रश्नांवर महासभेत चर्चा न झाल्याने पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, १ आॅक्टोबर रोजी सिडकोकडून महापालिकेकडे आरोग्य सेवा हस्तातंरण करण्यात येणार आहे. विरोधक सभागृहात उपस्थित नसल्याने या महत्त्वपूर्ण विषयावर योग्य ती चर्चा होऊ शकली नाही.
पालिकेच्या सभागृह नेतेपदी परेश ठाकूर यांची निवड करण्यात आली. विरोधकांच्या सभात्यागामुळे विरोधीपक्ष नेतेपदाची निवड लांबणीवर पडली. या पदावर प्रीतम म्हात्रे यांची निवड अंतिम झाल्याचे शेकापच्या सूत्रांनी सांगितले
>पनवेलमध्ये पाण्याच्या टाक्या उभारणार
पनवेल शहरात महापालिकेच्या वतीने जलकुंभ उभारण्यात येत आहेत. हे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. तसेच शहरातील पाणी पुरवठा करणारे अधिकारी कामात दिरंगाई करीत असल्याने त्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी केली.
>सिडको वसाहतीमधील कामे रखडली
पनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको परिसरातील कोणत्याच नगरसेवकाचे काम पालिकेमार्फत होत नाही. सिडकोकडे गेल्यावर पालिकेकडे बोट दाखविले जाते, तर पालिका सिडको प्रशासनाकडे बोट दाखवत आहे. अशा परिस्थितीत कामे कशी होणार? असा प्रश्न निलेश बाविस्कर यांनी उपस्थित केला.
>खारघरमधील पाणीप्रश्न गंभीर
खारघर शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रहिवाशांना टँकरच्या पाण्यासाठी लाखो रु पये अदा करावे लागत आहेत. वर्षभरात सिडकोवर आम्ही १८ मोर्चे काढूनदेखील परिणाम झाला नसल्याचे नगरसेविका लीना गरड यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेसोबत बोलणी करून खारघरला अतिरिक्त पाणीपुरठा करावा, अशी मागणी गरड यांनी केली. या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ यांनीदेखील नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकासोबत बैठक घेतली जाईल, असे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले.
>महत्त्वाच्या विषयावर चर्चा
प्रभाग सहामधील नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी खारघरमधील मोकाट कुत्र्यांच्या विषयाची लक्षवेधी मांडली. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक रस्त्यावर फिरू शकत नसून, शालेय विद्यार्थी व लहान मुलांच्या जीवास धोका असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यासंदर्भात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडकोसोबत पाठपुरावा करून आरोग्य विभागाला योग्य ते निर्देश दिले जातील, असे उत्तर दिले.

Web Title: Municipal councils of Panvel, Manasuman's plays, municipal councils on municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.