शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पालिका रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा बंद

By admin | Published: November 18, 2016 4:15 AM

अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील

नामदेव मोरे / नवी मुंबई अग्निशमन यंत्रणा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देवून महापालिकेने नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी रद्द करून गुन्हा दाखल केला. पण प्रत्यक्षात महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामधील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. पालिकेचे ३०० व फोर्टीजचे १५० बेडचे रूग्णालय असूनही स्वतंत्र मलनि:सारण केंद्र नाही. यामुळे आता मनपा रूग्णालयाचीही नोंदणी रद्द करायची का, असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रद्द करून गुन्हा दाखल केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर रूग्णालयांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयामध्येही नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. अनेक वर्षांपासून येथील अग्निशमन यंत्रणा बंद आहे. अग्निशमन दलाने वारंवार सूचना देवूनही दुरूस्तीचे काम सुरू केलेले नाही. आग लागल्यास तत्काळ विझविण्यासाठी काहीही उपाययोजना नाही. रूग्णालयामधील लिफ्टही वारंवार नादुरूस्त असते. अशा स्थितीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास रूग्णांनी बाहेर कसे निघायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने डी. वाय. पाटील रुग्णालयाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. एक हजार बेडचे रूग्णालय असल्याने त्यांच्याकडे स्वतंत्र एचटीपी प्लँट असणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. महापालिकेचे ३०० बेडचे रूग्णालय आहे, याशिवाय शेजारी फोर्टीज रूग्णालय १५० बेडचे आहे. एकूण ४५० बेडच्या या रूग्णालयांनाही स्वतंत्र एचटीपी केंद्र नसताना फक्त डी. वाय. वर कारवाई का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महानगरपालिका स्वत: नियम पायदळी तुडवत असून दुसऱ्यांवर मात्र क्षुल्लक कारणास्तव कारवाई करत आहे. शहरातील ८० टक्के रूग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीमध्ये नाही. स्वतंत्र एचटीपीची सोय नाही. पालिकेने डी. वाय. पाटीलवर केलेली कारवाई आकसाने केल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित रूग्णालयामध्ये रूग्णांनी जावू नये, असे आवाहन केले आहे. यामुळे रूग्णांचाही गोंधळ उडू लागला आहे. शहरात मोफत उपचार करणारे डी. वाय. हे एकमेव रूग्णालय आहे. तेच बंद झाले तर जायचे कुठे, असा प्रश्न रूग्णांनी विचारला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या कारवाईवर टीका केली आहे. रूग्णालयाकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, पण अशाप्रकारे गुन्हे दाखल करून व त्याविषयी प्रसिद्धी करून बदनामी करू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, या प्रश्नाचे पडसाद यापुढील पालिकेच्या सभांमध्येही उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.