महापालिका अधिकारी, ठेकेदारांची हातमिळवणी तर वरिष्ठांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:35 PM2020-03-10T23:35:17+5:302020-03-10T23:35:29+5:30
स्थायी समिती सभापती नवीन गवते यांचा आरोप
नवी मुंबई : महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असून अनेक चुकीची कामे केली जात असल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी केला आहे. याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचे ते म्हणाले. सोमवारी ९ मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत तुर्भे विभागातील ३ स्मशानभूमींमध्ये साफसफाई, देखभाल आणि परिचलन करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आला होता. त्यावर चर्चा करताना सभापतींनी आरोप केले.
तुर्भे विभागातील नवी मुंबई महापालिकेच्या तीन स्मशानभूमींमध्ये स्वच्छता, देखभाल आणि परिचलन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी या कंत्राटाच्या माध्यमातून काय काय सुविधा देण्यात येणार आहेत याबाबत माहिती विचारली. मनुष्यबळ पुरविणे, स्वच्छता देखभाल दुरु स्ती हा एक भाग असून मोफत अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य पुरविणे हा दुसरा भाग असल्याचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले. नगरसेवक बिस्ट यांनी महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया या सर्व सुविधांची दिघा विभाग प्रमुखांना माहिती नसल्याचे सांगत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सुविधांबाबत विभाग प्रमुखांना माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. स्थायी समितीचे सभापती गवते यांनी या विषयावर बोलताना सांगितले की अनेक स्मशानभूमींमध्ये नको त्या गोष्टी चालत असून, या ठिकाणी गांजा ओढणाऱ्यांचादेखील वावर आहे. स्मशानभूमीमध्ये सुविधा मिळत नसून याबाबत विभाग प्रमुखांनादेखील याबाबत काहीच कल्पना नसल्याचा गौप्यस्फोट केला. दिघा येथील विभाग प्रमुखांना दिघ्याची हद्ददेखील माहीत नसून त्यांची बदली करण्यात यावी, अशी सूचना गवते यांनी प्रशासनाला केली. प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असल्याने अनेक चुकीची कामे होत असल्याचे सांगत दिघा येथील स्मशानभूमीमध्ये एक सफाई कामगार कामावर नसताना त्याच्या नावाने त्याचे वेतन काढले जाते, तसेच वेतनाचा फरकदेखील देण्यात आला असल्याचा आरोप गवते यांनी केला. याबाबत सर्व पुरावे आणि कागदपत्रे आपल्याकडे असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे लक्ष नसल्याचे गवते म्हणाले.
प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असल्याने अनेक चुकीची कामे होत असल्याचे सांगत दिघा येथील स्मशानभूमीमध्ये एक सफाई कामगार कामावर नसताना त्याच्या नावाने त्याचे वेतन काढले जाते, तसेच वेतनाचा फरकदेखील देण्यात आला असल्याचा आरोप गवते यांनी केला.