शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापालिका अधिकारी, ठेकेदारांची हातमिळवणी तर वरिष्ठांचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:35 PM

स्थायी समिती सभापती नवीन गवते यांचा आरोप

नवी मुंबई : महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असून अनेक चुकीची कामे केली जात असल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी केला आहे. याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचे ते म्हणाले. सोमवारी ९ मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत तुर्भे विभागातील ३ स्मशानभूमींमध्ये साफसफाई, देखभाल आणि परिचलन करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आला होता. त्यावर चर्चा करताना सभापतींनी आरोप केले.

तुर्भे विभागातील नवी मुंबई महापालिकेच्या तीन स्मशानभूमींमध्ये स्वच्छता, देखभाल आणि परिचलन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी या कंत्राटाच्या माध्यमातून काय काय सुविधा देण्यात येणार आहेत याबाबत माहिती विचारली. मनुष्यबळ पुरविणे, स्वच्छता देखभाल दुरु स्ती हा एक भाग असून मोफत अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य पुरविणे हा दुसरा भाग असल्याचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले. नगरसेवक बिस्ट यांनी महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया या सर्व सुविधांची दिघा विभाग प्रमुखांना माहिती नसल्याचे सांगत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सुविधांबाबत विभाग प्रमुखांना माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. स्थायी समितीचे सभापती गवते यांनी या विषयावर बोलताना सांगितले की अनेक स्मशानभूमींमध्ये नको त्या गोष्टी चालत असून, या ठिकाणी गांजा ओढणाऱ्यांचादेखील वावर आहे. स्मशानभूमीमध्ये सुविधा मिळत नसून याबाबत विभाग प्रमुखांनादेखील याबाबत काहीच कल्पना नसल्याचा गौप्यस्फोट केला. दिघा येथील विभाग प्रमुखांना दिघ्याची हद्ददेखील माहीत नसून त्यांची बदली करण्यात यावी, अशी सूचना गवते यांनी प्रशासनाला केली. प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असल्याने अनेक चुकीची कामे होत असल्याचे सांगत दिघा येथील स्मशानभूमीमध्ये एक सफाई कामगार कामावर नसताना त्याच्या नावाने त्याचे वेतन काढले जाते, तसेच वेतनाचा फरकदेखील देण्यात आला असल्याचा आरोप गवते यांनी केला. याबाबत सर्व पुरावे आणि कागदपत्रे आपल्याकडे असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांचे याकडे लक्ष नसल्याचे गवते म्हणाले.प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी असल्याने अनेक चुकीची कामे होत असल्याचे सांगत दिघा येथील स्मशानभूमीमध्ये एक सफाई कामगार कामावर नसताना त्याच्या नावाने त्याचे वेतन काढले जाते, तसेच वेतनाचा फरकदेखील देण्यात आला असल्याचा आरोप गवते यांनी केला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका