नवी मुंबई : गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने यावर्षी आॅनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. शुक्रवारपर्यंत २६९ जणांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले असून १०२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी नाकारलेल्या मंडळाच्या पदाधिकाºयांची परवानगीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
महापालिकेच्या ई सेवा संगणक प्रणालीवर दाखल केलेल्या आॅनलाइन अर्जाद्वारे मंडप परवानगीशी संबंधित पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन अशा सर्व प्राधिकरणांचे ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे एकाच अर्जावर उपलब्ध होत असल्याने गणेशोत्सव मंडळांची वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या कार्यालयांमध्ये जाऊन संपर्क साधण्याची धावपळ कमी झाली आहे व कार्यपध्दतीत सुलभता आलेली आहे. या प्रणालीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या या संकेतस्थळावरील, मुख्यपृष्ठावर, नागरी सेवा सेक्शनमध्ये, मंडप परवानगीकरिता सहजपणे अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या आॅनलाइन प्रणालीव्दारे मंडळांना आहे त्या ठिकाणाहून अर्ज करता येणे शक्य होत असून अर्ज भरताना काही अडचणी आल्यास महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातही सायं. ३ ते ५ या वेळेत या मंडळांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य केले जात आहे. गणेशोत्सवाचा कालावधी जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन आयुक्तांच्या निर्देशानुसार परवानगी देण्याच्या कामकाजात अधिक वेळ काम करून गतिमानता आणली जात आहे. प्रणालीवर २६९ अर्ज दाखल झाले असून त्यामधील १0२ जणांना परवानगी देण्यात आली आहे व ७0 अर्ज कार्यवाही प्रक्रि येत आहेत. यामध्ये ९४ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामधील अनेक मंडळांनी दुबार अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक जागेवर मंडप टाकण्याची परवानगी देण्यात येते. मात्र अनेक मंडळांनी खाजगी जागेवर उत्सव साजरा करण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत.२ सप्टेंबरपर्यंतच परवानगी मिळणारच्१३ ते २३ सप्टेंबर २0१८ या कालावधीत संपन्न होणाºया गणेशोत्सवाआधी दोन महिन्यापासून म्हणजेच १३ जुलैपासून मंडप परवानगी प्रक्रि या नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केली असून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सवाला १0 दिवस राहिले असताना म्हणजेच ३ सप्टेंबरनंतर कुणालाही परवानगी दिली जाणार नाही याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. च्मंडळांनी या अभिनव प्रणालीचा मंडप परवानगी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.