महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अन् मेडिकल कॉलेजला सीएसआर फंडाचा मिळणार बूस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 02:41 PM2023-05-04T14:41:30+5:302023-05-04T14:41:46+5:30
प्रकल्पाचे मंदा म्हात्रे यांनी आयुक्त दालनात केले सादरीकरण
नवी मुंबई:आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते.
याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अथक पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे 8.40 एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे 819.30 कोटी खर्च येणार आहे. त्याकरिता त्यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर हे CSR Fund करिता पर्यंत करणार आहे.
हॉस्पिटल हे G+9 एवढ्या मजल्याचा असणार आहे. तसेच कँसर, हृदय, मेंदू अश्या अनेक मोठ मोठ्या आजारांवर सेवा दिली जाणार आहे. जे काही आजार असेल त्या उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया व इतर सुविधा ह्या प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे. तसेच सदर हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ही 500 बेड हून अधिक असून हॉस्पिटल पूर्णत: सर्व सुविधयुक्त बनणार आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सदरच्या क्षेत्रफळामध्ये पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांनसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे व सदर प्रकल्पामध्ये अजून काही सुविधा व उपाय करता येईल का असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे हे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण आहे. यावेळी म्हात्रे यांनी सांगितले कि, सदर प्रकल्प हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे उभा राहणार आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हात्रे यांच्या समवेत न.मुं.म.पा आयुक्त राजेश नार्वेकर, न.मुं.म.पा अतिरिक्त आयुक्त, . संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, उपस्थित होते.