शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

उपशाखाप्रमुखावर खुनी हल्ला

By admin | Published: March 30, 2017 7:01 AM

शिवसेनेचे इंदिरानगर येथील उपशाखाप्रमुख इस्माईल शेखवर १० ते १५ जणांनी खुनी हल्ला केला

नवी मुंबई : शिवसेनेचे इंदिरानगर येथील उपशाखाप्रमुख इस्माईल शेखवर १० ते १५ जणांनी खुनी हल्ला केला. शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या मनपा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तुर्भे इंदिरानगरच्या चौकामध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इस्माईल शेख थांबले होते. परिचितांबरोबर गप्पा मारत असताना इंडिगो ईसीएस एमएच ०३ बीसी ३६४६ या कारमधून व इतर वाहनांमधून जीवन गायकवाड, प्रमोद देशमुख व त्यांचे १० ते १५ साथीदार आले व शेखला लाथा, बुक्क्यांसह विटांनी मारहाण करण्यास सुरवात केली. चार ते पाच मिनिट बेदम मारहाण केल्यानंतर सर्वांनी तिथून पलायन केले. उपस्थितांपैकी काहींनी त्यांच्या कारचा फोटो काढून घेतला. या घटनेचे वृत्त समजताच शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले व इतरांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी शेखला उपचारासाठी वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले व पोलिसांना याविषयी माहिती दिली. या घटनेमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, पण सर्वांनी शांत राहण्याचे आवाहन केल्याने इतर प्रसंग टळला. बुधवारी सायंकाळपर्यंत शेखवर उपचार सुरू होते. त्याच्या हाताला, पाठीवर व मानेवर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी हल्ला करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा दावा दाखल करण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळी सेनेचे पदाधिकारी विठ्ठल मोरे, समीर बागवान व इतरांनी रुग्णालयात जावून जखमीची विचारपूस केली. खासदार राजन विचारे यांनीही या प्रकरणी पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. हल्ला करणारा संशयित जीवन गायकवाड हा इंदिरानगरमध्येच राहणारा आहे. त्याच्यावर यापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तो अनेक वर्षे तुरुंगात होता. दुसरा संशयित प्रमोद देशमुख हाही सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी ऐरोलीमधील छोटू माळीच्या खुनाचा आरोप असून या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून त्याला अटकही झाली होती.