नवी मुंबई : माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत देशी वृक्षांचे रोपण करून अमृत वाटिका निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली.
नेरूळ मधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या आर. एस. सिंग यांच्या पत्नी मिरादेवी, एन. एस. कठैत यांची मुलगी अनिता गांधी, भोपाल सिंग यांच्या पत्नी हरमिंदर कौर, जम्मू कश्मीरमध्ये शहीद झालेल्या लक्ष्मण शेळके यांचा मुलगा अर्जुन शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये बँक ऑफ बरोडा मधील दरोडा रोखताना शहीद झालेल्या पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब आढाव यांच्या पत्नी शुभांगी आढाव यांचाही सन्मान करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानानिमीत्त ७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमृत वाटिका तयार करण्याची घोषणाही करण्यात आली. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक येथे वास्तव्याला असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आमदार मंदा म्हात्रे यांनीही या अभियानामध्ये नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियानाविषयी व महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्धा वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, देशाची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू , देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेतली.
शासकीय पोर्टलवर सेल्फी पाठविण्याचे आवाहनकार्यक्रमाच्या वेळी माती व मातीचे दिवे हातात घेऊन सेल्फी व छायाचित्रे काढली. हा सेल्फी किंवा छायाचित्र मेरीमाटी मेरा देश या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. या उपक्रमात सहभागी होणारांना ऑनलाईन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये मातृभूमीविषयीचे व शहीद वीरांविषयीचे आपले प्रेम व अभिमान व छायाचित्र अभियानाच्या वेबसाईटवर पाठविण्याचे आवाहनही महानगर पालिकेने केले.