मुंबई : मध्य रेल्वेकडून आपल्या हद्दीतील दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. त्यानुसार, नागोठणे ते रोहा दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, त्या दरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३0 मार्च ते १ एप्रिलपर्यंत हा ब्लॉक असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या ब्लॉकमुळे काही डेमू व एक्स्प्रेस सेवांवर परिणाम होणार आहे. रद्द ट्रेनट्रेन नंबर ५0११९ दिवा-पनवेल पॅसेंजर, ट्रेन नंबर ५0१0४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर आणि ट्रेन नंबर ५0१0३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. ३0 मार्च-नागोठणे यार्ड ते रोहा स्टेशन (दु.१२ ते दु.१५)डाउन ट्रेनट्रेन नंबर ७१0८९ आणि ७१0९५ दिवा-रोहा डेमू ट्रेन नागोठणेपर्यंत चालवण्यात येईल. ट्रेन नंबर १६३४५ एलटीटी-थिरुवनंथपुरम सेन्ट्रल नेत्रावती एक्स्प्रेस पेण येथे सव्वा तास थांबणार आहे. अप ट्रेनदिवा-रोहा डेमू ट्रेन नागोठणेहून सुटेल. ट्रेन नंबर २२६३0 थिरुनेलवेल्ली-दादर एक्स्प्रेस ही दादर स्थानकात १५.१0 ऐवजी रात्री १९.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस ही ३ तास १0 मिनिटे उशिराने पोहोचेल. ट्रेन नंबर ११0८६ मडगाव-एलटीटी डबल डेकर एलटीटी येथे ३ तास उशिरा पोहोचेल. ३१ मार्च - ब्लॉक (११.५५ ते १७.५५)डाउन ट्रेनदिवा-रोहा डेमू कासूपर्यंतच धावणारनेत्रावती एक्स्प्रेस कासू येथे ५0 मिनिटे थांबणारट्रेन नंबर १२६१९ एलटीटी-मेंगलोर एक्स्प्रेस पेण येथे ५0 मिनिटे थांबेल. ट्रेन नंबर १0१११ मुंबई-मडगाव कोकणकन्या सीएसटीहून रात्री २३.0५ ऐवजी २३.५५ वाजता सुटेल. अप ट्रेनट्रेन ७१0९२ रोहा-दिवा डेमू नागोठणेहून सुटेल. ट्रेन ७१0९६ रोहा-दिवा डेमू कासूहून सुटेल. नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईत सव्वा चार उशिराने पोहोचेल.ट्रेन १0१0४ मडगाव-मुंबई ही सीएसटीला २१.४0 वाजताच्या ऐवजी २२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर ५0१0६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ट्रेन पनवेलपर्यंतच धावेल.१ एप्रिल- रोहा यार्ड ब्लॉक (१२.३५ ते १५.३५) पर्यंतडाउन ट्रेनट्रेन १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस नागोठणे स्थानकात ३0 मिनिटे थांबेल.अप ट्रेनट्रेन १६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस एक तास उशिराने पोहोचेल. ट्रेन ११0८६ मडगाव-एलटीटी डबल डेकर एलटीटी येथे १७.१0 ऐवजी १८.१५ वाजता पोहोचेल.
नागोठणे-रोहा तीन दिवस ब्लॉक
By admin | Published: March 30, 2017 6:48 AM