नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार
By कमलाकर कांबळे | Published: July 1, 2024 12:18 AM2024-07-01T00:18:26+5:302024-07-01T00:18:43+5:30
कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली नागपूर - मडगाव जंक्शन आणि मडगाव जंक्शन - नागपूर या द्वि-साप्ताहिक गाड्यांची सेवा सप्टेंंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. याअगोदर या गाडीची सेवा ३० जूनपर्यंत मर्यादीत होती. मात्र या गाड्यांना प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेच्या समन्वयाने ही विशेष सेवा २९ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार या गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली जाते. प्रवाशांच्या मागणीनुसार नागपूर- मंडगाव जंक्शन ( ०११३९) ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही सेवा २९ जूनपर्यंत मर्यादीत केली होती. मात्र आता ही गाडी बुधवार आणि शनिवार असे आठवड्यातून दोनदा २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ( ०११४०) ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडीची कालमर्यादा ३० जूनपर्यंत निश्चीत करण्यात आली होती. आता याचा विस्तार करण्यात आला असून आठवड्यातून गुरूवार आणि रविवार असे दोन दिवस २९ सप्टेंंबरपर्यंत चालविली जाईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.