शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राजपत्रित वर्ग दोन ग्रेड पेसाठी नायब तहसीलदार संपावर; पनवेलसह रायगड जिल्ह्यातील कामकाजावर परिणाम 

By वैभव गायकर | Published: April 03, 2023 4:02 PM

या संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली.

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेलराज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग 2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी दि.3 पासुन बेमुदत संपाचा पवित्रा घेतला आहे.पनवेल सह रायगड जिल्ह्यात याचे परिणाम पहावयास मिळाले.या संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी निदर्शन करण्यात आली.

नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याने हा संपाचा हत्यार उगारण्यात आला असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना सचिन शेजाळ यांनी स्पष्ट केले.

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नसल्याने हे संप पुकारण्यात आले असल्याचे शेजाळ यांनी सांगितले.दरम्यान या संपाचा परिणाम स्थानिक पातळीवर होणार आहे.पुरवठा विभाग,संजय गांधी निराधार योजनेसह शेतकऱ्यांच्या संबंधित जमिनीची प्रकरणे नायब तहसीलदार हाताळत असतात यामुळे हि सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता आहे.

नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये  करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.समान काम समान वेतन या धोरणाच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांना ठरल्या प्रमाणे ग्रेड देणे गरजेचे आहे.त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी प्रतिक्रिया पनवेल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांनी दिली.

तत्कालीन अपर मुख्य सचिव,महसूल मंत्री, वित्त मंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन देखील त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने वेतन त्रुटी समितीचे अध्यक्ष  के.पी. बक्षी यांचच्या समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे 4800 रुपये रवाढविण्याबाबत सादरीकरण करुनही त्याची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याची नाराजी संघटनेचे अध्यक्ष सचिन शेजाळ यांनी व्यक्त केली.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील एकुण 15 तालुक्यातील नायब तहसीलदारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रीत येऊन निदर्शन केली.

आमचा हा लढा आत्मसन्माचा लढा आहे.शासन मान्यता प्राप्त आमची संघटना असुन राज्यभरात  2200 सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत.राज्यात इतर विभागात राजपत्रित वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना 4800 ग्रेड मिळत असेल तर आम्हाला का नाही ?हि आमची महत्वाची मागणी आहे.आम्ही अतिरिक्त काही मागत नसुन नियमानुसार ठरलेल्या गोष्टींचाच पूर्तता करा अशी आमची मागणी आहे. - सचिन शेजाळ (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना )

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :panvelपनवेलStrikeसंप