आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर नाईक नाराज
By Admin | Published: September 12, 2016 03:29 AM2016-09-12T03:29:32+5:302016-09-12T03:29:32+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर माजी मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर माजी मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. प्रशासनाचा कारभार हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. त्याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे संकेत नाईक यांनी दिले आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यापाठोपाठ आता नाईक यांनीही आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी प्रकट केल्याने येत्या काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.
अत्तपर्यन्त भाजप याविरोधात उतरले होते, तोपर्यंत राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा गणेश नाईक किंवा आमदार संदीप नाईक हे गप्प बसून होते आज प्रथमच गणेश नाईक देखील यांनी याविरोधात आंदोलन करण्याचे सूतोवाच केले,
गणेश नाईक यांच्या वाढिदवसा निमित्त राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने ब्लड डोनर चेन या कार्यक्र माचा शुभारंभ केला आहे. कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक हायस्कूलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमा नाईक यांच्या हस्ते या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रशासनाच्या मनमानी कराभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ही हिटलरशाही लोकशाहीला घातक आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.प्रसंगी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, परंतु जनतेवर अन्याय करणारी हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा नाईक यांनी दिला आहे. आयुक्त मुुंढे यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपध्दतीवर नाईक यांनी पहिल्यांदाच जाहिर नाराजी प्रकट केली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्याला वेगळे महत्व आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी यापूर्वीच मुंढे यांच्या विरोधात कंबर कसली आहे. आता यात नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनीही अप्रत्यक्ष उडी घेतल्याने येत्या काळात आयुक्त मुंढे यांची कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)