शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

झोपडपट्टी परिसरात नालेसफाईचा बोजवारा

By admin | Published: May 08, 2017 6:36 AM

महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला गती दिली आहे. शहराच्या विविध भागांत नाल्यातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे असले तरी झोपडपट्टी परिसरात मात्र अद्यापि, या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा झोपडपट्टी परिसरात या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. त्यामुळे ही मान्सूनपूर्व साफसफाईची कामे म्हणजे केवळ औपचारिकता ठरल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात ठिकठिकाणी नाल्यातील गाळ उपसून तो पदपथांवर गोळा करण्यात आला आहे. काही भागांतील कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी अद्यापि गाळ उपसण्याची कामे सुरू आहेत; परंतु झोपडपट्टी परिसरात अद्यापि कामाला सुरुवातच करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या परिसरात अगोदरच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. नाले,गटारात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, बीअरच्या बाटल्या आदी घनकचरा साचला आहे. या परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा अपुऱ्या आहेत. मलनि:सारण वाहिन्या केवळ नावालाच आहेत. बहुतांशी ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यात मलवाहिन्या सोडल्या आहेत. एकूणच या वसाहतीतील रहिवाशांनी १२ महिने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे पावसाळ्याअगोदर नालेसफाईची कामे होणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे मत आहे; परंतु प्रत्येक वर्षी झोपडपट्टी परिसरातील नालेसफाईच्या कामांना प्रशासनाकडून दुय्यम दर्जा दिला जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ व ५मध्ये सध्या दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. गणपतीपाडा येथील रेल्वे मार्गालगत असणारे नाले पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. तसेच इलठाणपाडा, सुभाषनगर, कन्हैयानगर आदी भागांतील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, नालेसफाईला लवकरच सुरुवात केली जाईल, असे दिघा विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. झोपडपट्टी परिसरात अद्यापि, नालेसफाईची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. शेवटच्या क्षणी घाईघाईत ही कामे उरकण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे, दैनंदिन साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांवरच नालेसफाईची जबाबदारी टाकली जाते. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसणार आहे.- जगदीश गवते, नगरसेवक (प्रभाग क्रमांक ५)