नांदगाव पूल बनला धोकादायक; अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:53 AM2019-08-07T02:53:05+5:302019-08-07T02:53:24+5:30
संरक्षण कठडा बांधण्याची गरज
पनवेल : भिंगार व नांदगावला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली आहे. येथील नदीची पातळी वाढल्यास पाणी पुलावर येत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाºया वाहनांना मोठा धोका उद्भवतो. पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ओएनजीसी पुलाखाली पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्यामुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी लागणाºया वाहनांच्या लांबच लांब रांगा लक्षात घेता अनेक जण नांदगाव पुलामार्गे पळस्पे फाटा गाठतात. मात्र, पुलाची झालेली दुरवस्था लक्षात घेता, डागडुजीची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात आला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या पर्यायी मार्गाचा वापर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी पुलाच्या डागडुजीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुलावरून अनेकदा पाणी गेले आहे, प्रशासनाने या ठिकाणी वेळीच उपायययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.