नारनवरे यांनी सिडकोचा पदभार स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:45 PM2019-07-18T23:45:36+5:302019-07-18T23:45:41+5:30
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.
नवी मुंबई : सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. डॉ. नारनवरे हे पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते.
डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. डॉ. नारनवरे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत काही अभिनव योजना व प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. जलसंवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.
जलयुक्त शिवार योजनेचा त्यांनी राबविलेला पॅटर्न हा उस्मानाबाद पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. २०१३ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. काही बदल करून राजस्थान सरकारनेही हा पॅटर्न स्वीकारला आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळासह नैना, मेट्रो या महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असणार आहे.