नवी मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी समन्वय साधला असता, तर वेगळा निर्णय लागला असता, असे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण पदवीधर मतदार संघात ठाकूर यांचे सहकार्य घेण्याचे सूतोवाच बुधवारी केले.केंद्र व राज्यातील सत्तेचा भाजपाला माज आल्याची टीकाही त्यांनी केली.कोकण पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्यासाठी घेतलेल्या विविध पक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुल्ला यांना काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी आणि आरपीआय (कवाडे गट) यांनी पाठिंबा दिला आहे.पारदर्शक निवडणुकीच्या तत्त्वाला भाजपाकडून हरताळ फासल्याचे पालघर आणि भंडारा-गोंदिया येथील पोटनिवडणुकीत समोर आले. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. सत्ता आल्यावर माजायचे नसते, या तत्त्वाचा भाजपाला विसर पडला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सत्ताधाºयांकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे. विरोध करणाºयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. विरोधी पक्षातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारावर दबावाचा प्रयत्न झाला, परंतु तो तेथील मतदारांनी झुगारला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदारांवर खटले भरण्यात आले आहेत. चिदंबरम यांच्यासारख्या देशाच्या माजी मंत्र्यांवर दबावतंत्राचा अवलंब करून, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला, अशी उदाहरणेही त्यांनीदिली.लोकसभेच्या भंडारा-गोंदिया येथील पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी १८0 मतदानयंत्रात बिघाड झाला. उन्हामुळे हा बिघाड झाल्याचा हास्यास्पद दावा निवडणूक विभागाने केला. निवडणूक आयोग सत्ताधाºयांच्या हातचे बाहुले बनले असेल, तर ते लोकशाहीला घातक आहे. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे पाटील, भास्कर जाधव, माथाडी नेते नरेंद्र पाटील आदींची भाषणे झाली. माजी मंत्री गणेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आदींसह आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.३६ अर्ज दाखलमुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघात बुधवारपर्यंत ३६ जणांनी अर्ज दाखल केले. ७ जून हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उन्हाळ्यामध्ये मतदार गावी गेले असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.बुधवारपर्यंत मुंबई शिक्षक मतदार संघात १२, मुंबई पदवीधर मतदार संघात ११ आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी १३ जणांनी अर्ज दाखल केले. भाजपातर्फे निरंजन डावखरे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. ८ जूनला अर्जांची छाननी, ११ जूनपर्यंत माघारी, २५ तारखेला मतदान आणि २८ला मतमोजणी होणार आहे.अर्ज भरलेले उमेदवार :मुंबई पदवीधर मतदार संघ - दीपक तानाजी पवार (अपक्ष), विलास विनायक पोतनीस-शिवसेना (दोन अर्ज), सुप्रदा प्रकाश कातर्पेकर (तीन अर्ज), रमेश चंपतराव ठाकरे, जल्ािंदर देवराम सरोदे, राजेंद्र दत्ताराम कोरडे, चंदन चित्तरंजन शर्मा, राजेंद्र हिरामण वाघमारे.मुंबई शिक्षक मतदार संघ - कपील हरिश्चंद्र पाटील, ज्ञानदेव लक्ष्मण हांडे, अनिल राजेसिंग देशमुख, सैयद नजमुल हसन, चंद्रकांत बाजीराव पाटील, अनिल दोघू बोरनारे, बाळासाहेब महादेव म्हात्रे, शिवाजी शेंडगे, प्रशांत रमेश रेडीज, तानाजी कांबळे, अनिल देशमुख (दोन अर्ज).कोकण पदवीधर मतदार संघ - मिलिंद कांबळे, कल्पेश केणी, इरफान पटेल (काँगे्रस), सुवर्णा सुनील पाटील, बैरियन डाबरे, संजय मोरे (शिवसेना), महेश भोईर, रमेश यशवंत हिंदुराव, अरुण आंबेडकर, नजीब सलेमान मुल्ला (राष्ट्रवादी काँगे्रस), अमोल पवार.
हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा गळ, शरद पवारांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:54 AM