नवरात्रीसाठी नवरंगी बाजारपेठा

By admin | Published: September 30, 2016 04:06 AM2016-09-30T04:06:03+5:302016-09-30T04:06:03+5:30

नवरात्रीला अवघे तीन दिवस उरले असताना खरेदीला उधाण आले असून शहरातील बाजारपेठा नवरंगांनी सजल्या आहेत. नवरात्रीतील चालणाऱ्या दांडिया रास, गरबा नृत्य

Navarangi market for Navratri | नवरात्रीसाठी नवरंगी बाजारपेठा

नवरात्रीसाठी नवरंगी बाजारपेठा

Next

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई
नवरात्रीला अवघे तीन दिवस उरले असताना खरेदीला उधाण आले असून शहरातील बाजारपेठा नवरंगांनी सजल्या आहेत. नवरात्रीतील चालणाऱ्या दांडिया रास, गरबा नृत्य यासाठी जिकडेतिकडे दागिन्यांचा लखलखाट पहायला मिळतो आहे. नक्षीकाम केलेले दागिन्यांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
दागिन्यांशिवाय पोशाखाला सौंदर्य येत नाही म्हणूनच बाजारात अगदी डोक्यावरच्या बिंदीपासून ते पायातील पैंजणांपर्यंत विविध दागिने उपलब्ध आहेत. कच्छी, राबेरी, काच, काचेचे मणी, मेटल, आॅक्साईड, कापड, लाकूड असे विविध प्रकारच्या दागिन्यांना वाढती मागणी आहे. गरब्यासाठी मेटलच्या, आॅक्साईड, तांब्या-पितळेचे दागिन्यांचे आणि काळ्या धाग्यापासून बनविलेले आकर्षक नेकलेस ८० रु पयांपासून १००० रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले राजस्थानी कडे, घागऱ्यावर बांधण्यासाठी कंबरपट्टा आदी आभूषणे पारंपरिकतेत आणखी भर टाकतात.
नऊ रंगांमध्येही ज्वेलरीचा आकर्षक सेट उपलब्ध असून आॅनलाइन खरेदीचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बिंदी : दागिन्यांची सुरुवात बिंदीपासून होते. भांगामध्ये तीन साखळ्या व कपाळावर रु ळणारे लोलक अशा साध्या दागिन्यांपासून भांगाच्या दोन्ही बाजूला असलेले घुंगरू, मोठे लोलक अशा विविध प्रकारांत बिंदी सजल्या आहेत.

झुमके : सध्या जिकडेतिकडे झुमक्यांची क्रे झ आहे. आकर्षक रंगीबेरंगी मोती लावलेल्या झुमक्यांना तरुणींची वाढती मागणी आहे. हे झुमके घागरा-चोलीवर विशेष उठून दिसतात.

गोंड्याच्या बांगड्या : राजस्थानी टच असलेल्या बांगड्यांना शोभेल असे रंगीत गोंडे लावल्यावर या बांगड्या तयार होतात. यात लाखेच्या बांगड्यांची विशेष क्र ेझ आहे.

कच्छी दागिने : कवडी आणि वेगवेगळ्या कच्छी एम्ब्रॉयडरीने कापडावर केलेल्या दागिन्यांना कच्छी दागिने म्हणतात. कमरबंध, बाजूबंद, मांगटिका, मंगल हार अशा पद्धतीतले हे दागिने सध्या खूप लोकप्रिय आहेत.

मेहंदीसोबत हातफुल खुलते. स्टोन नेकपीस, काचेच्या बांगड्यांनी हटके लूक देता येईल. ज्वेलरीचा आकार, रंग साजेसा असावा. मेटल, आॅक्साईडच्या दागिन्यांनी आकर्षक लूक येतो.
-माधुरी शेळके,
फॅशन डिझाईनर

Web Title: Navarangi market for Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.