नवी मुंबई - गृहप्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो जणांना आर्थिक गंडा घालणाºया माजी नेव्ही अधिकाºयाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. त्याने दोन कंपन्यांचा संयुक्त गृहप्रकल्प दाखवून ५०० हून अधिकांकडून लाखो रुपये घेतले होते. परंतु प्रकल्प पूर्ण न झाल्याने संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याने पळ काढला होता.पनवेलमधील विहीघर येथील येथे प्रस्तावित गृहप्रकल्पासाठी त्यांनी घर खरेदीसाठी इच्छुकांकडून लाखो रुपये घेतले होते. त्याकरिता ज्युपिटर इन्फ्रास्ट्रक्चर व पनवेलमधील एका बांधकाम व्यावसायिकाने एकत्रित कार्यालय सुरू केले होते. यादरम्यान ज्युपिटर इन्फ्रास्ट्रक्चरचा संचालक ए.के. शर्मा याने स्वत: नेव्हीचा माजी अधिकारी असल्याचा फायदा घेत बीएआरसी तसेच नेव्हीच्या इतर अधिकाºयांना घरांचे स्वप्न दाखवले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून ५०० हून अनेकांनी सन २०१३ मध्ये घराच्या एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम धनादेश अथवा रोख स्वरूपात दिली होती. परंतु त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्प सुरूच झाला नाही. यामुळे काही ग्राहकांनी मार्च महिन्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार खांदेश्वर पोलिसांकडे केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेमार्फत याप्रकरणी अधिक तपास सुरू होता. तपासादरम्यान उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पनवेलचा विकासक शैलेश दावडा (५४) याला अटक केली होती. मात्र, त्याचा दुसरा साथीदार ज्युपिटर इन्फ्रास्ट्रक्चरचा संचालक पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यानुसार आर्थिक शाखेचे सहायक निरीक्षक कृष्णा मेखले त्याच्या मागावर होते. अखेर तो बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानुसार मेखले यांच्या पथकाने बंगळुरू येथून त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे.या प्रकरणात ५०० हून अनेकांची तीन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. दावडा व शर्मा यांनी शासकीय कर्मचाºयांना भव्य गृहप्रकल्पाचे स्वप्न दाखवून घरासाठी गुंतवणूक करून घेतल्याचे तक्रारदार उज्ज्वल भट्टाचार्य यांनी सांगितले. तर शर्मा हा नेव्हीचा माजी कर्मचारी असल्याने त्याच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला असता, विश्वासघात झाल्याचेही ते म्हणाले.
नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:27 AM