शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:20 AM

नवी मुंबईत एक तीन मजल्यांची इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईच्या बेलापूर येथील शहाबाज गावात चार मजली इमारत 'इंदिरा निवास' कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीत ६४ वर्षांचा पुरुष आणि ४५ वर्षांची महिला अडकली होती. या घटनेत दोघेही सुरक्षितपणे बाहेर काढले गेले असून, त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य चालू असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र अजून एक व्यक्ती आत मध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बेलापूर येथील शहाबाज गावात तीन मजल्यांची इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली आहे. अचानक इमारत जमीनदोस्त झाल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली आहे. इमारत कोसळल्यानंतर सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची माहिती समोर आली. त्यातील दोघांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आणि उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक शर्थीचे प्रयत्न कत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीला हादरे बसण्यास सुरुवात होताच ३७ नागरिक सुखरुप बाहेर पडले.

"आम्हाला पहाटे ४.५० वाजता इमारत कोसळल्याचा फोन आला. २ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दोन जण अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे," अशी माहिती नवी मुंबईचे अग्निशमन अधिकारी  पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. "पहाटे च्या सुमारास इमारत कोसळली. ही तळमजला अधिक तीन मजले अशी इमारत आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे आणि दोघे अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे," अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात