आता ‘अदानी’ची मालकी प्रस्थापित; कंपनीच्या मालकी हक्क बदलास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:14 AM2021-06-24T07:14:43+5:302021-06-24T07:15:00+5:30

या बदलास केंद्र सरकारच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत.

Navi Mumbai Airport: Approval for change of ownership of the company pdc | आता ‘अदानी’ची मालकी प्रस्थापित; कंपनीच्या मालकी हक्क बदलास मान्यता

आता ‘अदानी’ची मालकी प्रस्थापित; कंपनीच्या मालकी हक्क बदलास मान्यता

Next

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करत ती अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. या कंपनीस देण्याच्या प्रस्तावास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.या विमानतळाच्या बांधकामासाठी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. यांची सवलतधारक म्हणून निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या मालकी हक्कामध्ये नुकताच बदल झाला असून यापूर्वी या कंपनीमध्ये ५०.५ टक्के सहभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर लि. या कंपनीचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. यांनी घेतले आहेत.

या बदलास केंद्र सरकारच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. तसेच सिडको संचालक मंडळानेही मालकी हक्काच्या बदलास मान्यता देण्याचा ठराव केला आहे. हा मालकी हक्क बदलण्यास राज्य मंत्रिमंडळाची अद्याप मान्यता मिळालेली नव्हती. हा बदल करण्यात यावा अशी शिफारस मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प नियंत्रण आणि अंमलबजावणी समितीने केली होती.

प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी

नवी मुंबई येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची भूविकास कामे पूर्ण झाली आहेत. या विमानतळाचा पहिला टप्पा २०२३-२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी आहे.

Web Title: Navi Mumbai Airport: Approval for change of ownership of the company pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.