शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
2
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
3
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
4
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
5
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
6
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
7
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
8
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
9
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
10
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
11
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
12
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
13
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
14
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
15
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
16
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
17
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
18
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
19
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
20
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

नवी मुंबई एअरपोर्ट, मेट्रोसह 'नैना' ही मुख्यमंत्री वॉररूमच्या कक्षेत

By नारायण जाधव | Published: September 07, 2022 4:20 PM

सिडकोसह जलसंपदाच्या अनेक प्रकल्पांवर नियंत्रण, पाच टप्प्यांवर करणार काम

नवी मुंबई : राज्यातील महत्त्वाचे विकासप्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्थापन केलेल्या वॉर रूमच्या कक्षेत केवळ एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच नव्हे तर, आता सिडकोच्या अखत्यारीतील नवी मुंबई एअरपोर्ट, नैना, खारघर कोस्टल रोडसह जलसंपदा खात्याच्या अखत्यारीतील काळू, बाळगंगा, कोंढाणे ही धरणांचा अंतर्भूत करण्यात आले आहे.राज्यातील महत्त्वाचे विकासप्रकल्पांना गती मिळावी यासाठी वॉररूमची स्थापना करून तिच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवृत्त सनदी अधिकारी राध्येश्यम मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता अधिकृतपणे तिच्या कार्यकक्षा काय असेल आणि कोण नियंत्रण ठेवेल, याबाबतची रुपरेषा सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केली आहे. अपेक्षनुरुप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहअध्यक्ष आहेत. तिचे कार्यालयही मुख्यमंत्री सचिवालयातच राहणार आहे.

पंतप्रधान गती आणि पंतप्रधान गतीशक्ती अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्पांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेल्या निर्णयांवर या वाररूममध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सिडकोच्या मनमानीस बसणार वेसणविशेष म्हणजे आता सबकुछ सिडको घेत असलेल्या नैना, नवी मुंबई विमानतळ, खारघर कोस्टल रोड, उलवे कोस्टल, सिडकोच्या मेट्रोबाबतही ही वाॅररूम निर्णय घेणार आहे. यामुळे सिडकोची मनमानीला वेसण घालण्याचे काम या माध्यमातून करण्याता येणार आहे.

धरणांच्या कामांवर नियंत्रणजलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील काळू, बाळगंगा, कोंढाणे या धरणांच्या बाबतीतील महत्त्वाच्या निर्णयांवर ही वॉररूम चर्चा करणार आहे. आतापर्यंत काळूचे काम एमएमआरडीए तर बाळगंगा, कोंढाणेचे काम सिडकोच्या माध्यमातून जलसंपदा विभाग करीत होता.

केंद्राच्या प्रकल्पांना देणार गतीकेंद्र सरकारच्या अखत्यारीतील बुलेट ट्रेन, रोहा-दिघी रेल्वे लाईन, सुरत चेन्नई् एक्सप्रेस वे आणि पुणे-बंगलोर एक्सप्रेस संदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांवरही या वॉररूममध्येचर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.

विकासकामांच्या गतीसाठी पाच कक्षकेंद्र आणि राज्याच्या अखत्यारीतील सर्व विकास प्रकल्पांची पाच टप्प्यांत विभागणी करून त्यानुसार ही वॉररूम काम करणार आहे. यामध्ये सध्या सुरू असलेले प्रकल्प, येत्या काळात घेण्यात येणारे प्रकल्प, विहित मुदतीत पूर्ण होणारे प्रकल्प, ज्या धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असलेले प्रकल्प आणि केंद्राच्या अखत्यारीतील गती देणे आवश्यक प्रकल्प असे हे ते पाच टप्पे आहेत.

या प्रकल्पांवर राहणार देखरेख१ सध्या सुरू असलेले प्रकल्प - मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, मुंबई-बडोदा एक्सप्रेस वे, पुणे-नाशिक हायस्पीड रेल कॉरिडोर, औरंगाबाद पाणी पुरवठा योजना,बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, माेघरपाडा, ठाणे, कांजुरमार्ग, रायमुर्धे येथील मेट्रोच्या कारशेड२- हाती घेण्यात येणारे प्रकल्प- विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, पुणे रिंग रोड, जालना -नांदेड एक्सप्रेस वे, वर्सोवा-विरार सी लिंक, वांद्रे सरकारी वसाहत पुनर्विकास प्रकल्प, वैनगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, रोहा-दिघी रेल्वे लाईन, ठाणे कोस्टल रोड, मीठी,दहिसर, पोईसर नदी पुनर्ज्जीवन प्रकल्प३ विहित मुदतीत पूर्ण होणारे प्रकल्प - एमएमआरडीए,मएमआरसीएल, सिडको, ठाणे,नागपूर या शहरांतील मेट्रो, काळू नदीवरील धरण४ धोरणात्मक निर्णय आवश्यक असलेले प्रकल्प - सिडकोचा नैना प्रकल्प, पुणे एअरपोर्ट, कोंढाणे आणि बाळगंगा धरण, उलवे आणि खारघरचा कोस्टल रोड५ गती देणे आवश्यक असलेले केंद्राचे प्रकल्प : सुरत चेन्नई् एक्सप्रेस वेसह पुणे-बंगलोर एक्सप्रेस वे आणि औरंगाबाद-पुणे एक्सप्रेस वे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईChief Ministerमुख्यमंत्री