नवी मुंबई  विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव, पनवेल महापालिकेत प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:35 AM2018-07-14T04:35:22+5:302018-07-14T04:36:06+5:30

प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

Navi Mumbai Airport news | नवी मुंबई  विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव, पनवेल महापालिकेत प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई  विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव, पनवेल महापालिकेत प्रस्ताव मंजूर

Next

पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपमहापौर चारुशीला घरत यांनी हा ठराव सभागृहासमोर मांडल्यानंतर नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या ठरावाला अनुमोदन दिल्यानंतर त्वरित हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव सिडकोसोबत चर्चा केल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी महासभेत स्पष्ट केले.
हा ठराव घेण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर, कुसुम म्हात्रे, अरु ण भगत, दर्शना भोईर, अमर पाटील यांनी प्रस्ताव सूचना केली होती. नुकतेच सिडको व एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीने विमानतळाच्या साईटवर जाऊन विमानतळाला दिबांचे नाव दिले. औपचारिकरीत्या केलेल्या या नामकरण सोहळ्यावेळी दिबांच्या नावाचे फलक देखील याठिकाणी लावण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नागझरी गावात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. ११ ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले असून या ग्रामस्थांना मदत देण्याची मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली. २९ गावांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाच्या ठरावाला देखील मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीमध्ये नवीन सदस्यांची निवड, पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पालिकेमार्फत तयार केलेल्या डीपीआरला यावेळी मंजुरी, अमृत योजनेअंतर्गत पालिकेचे बुडालेले २०० कोटी या विषयांवर महासभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कचरा व्यवस्थापनाकरिता इंदूर पॅटर्न
पालिका क्षेत्रात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामळे इंदूर शहरात ज्या प्रकारे कचऱ्याचे नियोजन केले जाते, तोच पॅटर्न पनवेल महानगर पालिका क्षेत्रात राबवावा, अशी मागणी नगरसेविका लीना गरड यांनी केली.

अमृत योजनेचे २०० कोटी गेले कुठे ?
पनवेल महानगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळणाºया २०० कोटींचे काय झाले ? असा प्रश्न नगरसेवक हरेश केणी व नितीन पाटील यांनी उपस्थित केला. मात्र योग्य पाठपुरावा झाला नसल्याने पालिकेला निधी मिळाला नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. याकरिता नव्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा
सिडकोची स्थापना होऊन तब्बल ४० वर्षांचा कालावधी लोटून देखील अनेक गावांचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. पनवेल तालुक्यातील
२९ गावांचा समावेश आहे. पनवेल महानगर पालिकेत असल्याने या गावांच्या सिटी सर्व्हेला महासभेने मंजुरी दिली असल्याने सर्व्हेनंतर सिडको व पालिकेचा हद्दीचा वाद संपणार असून गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सर्र्व्हेेकरिता पालिका १ कोटी ९० लाख रु पये भूमी अभिलेख विभागाला देणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगर पालिकेने अद्याप पालिकेतील गावांचा सर्व्हे केला नाही.

मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती केली गेली. याकरिता हजारो शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र शेतकºयांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेणाºया सिडकोविरोधात दि.बा. पाटील यांनी यशस्वी लढा दिला. देशाला साडेबारा टक्केचा नवा कायदा दिला. तसेच स्थानिकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा अधिकार दिल्याने अशा नेत्याच्या त्यागाची दखल घेण्यासाठी विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव द्यावे म्हणून हा ठराव करण्यात आला.
- परेश ठाकूर,
सभागृह नेते, पनवेल महापालिका

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबांच्या नावाचा आग्रह आम्ही यापूर्वी धरला होता. म्हणूनच आम्ही त्वरित या ठरावाला मंजुरी दिली आहे. पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना देखील अशाप्रकारचा ठराव झाला होता. सत्ताधाºयांनी याकरिता शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात ठरावाला महासभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. हा ठराव सिडकोसह राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Navi Mumbai Airport news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.