अनोख्या उत्साहात उमटले सूर दिवाळीचे, ‘नवी मुंबईचा अभिमान’ पुरस्कार सोहळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:29 AM2018-11-04T03:29:59+5:302018-11-04T03:30:15+5:30
दिवाळी निमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या, ‘सूर दिवाळीचे’ या कार्यक्रमात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मातून दिवाळीचे सूर छेडण्यात आले.
नवी मुंबई - दिवाळी निमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या, ‘सूर दिवाळीचे’ या कार्यक्रमात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मातून दिवाळीचे सूर छेडण्यात आले. यानिमित्ताने नवी मुंबई शहरातील २० कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला. ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्र माला प्रसिद्ध कलाकारांसह नवी मुंबई शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
शहराचा विकास हा फक्त शहरातील पायाभूत सुविधांवर अवलंबून नसतो, तर शहरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यागी वृत्तीने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानावर अवलंबून असतो. नवी मुंबई शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, आरोग्य जनजागृती, उद्योग समाज प्रबोधन, मराठी साहित्य व संस्कृती, ग्रंथालय चळवळ, खेळांचा प्रचार व राजकीय क्षेत्रामध्ये कामगिरी करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक वाढविणाºयांना, ‘नवी मुंबईचा अभिमान’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्र माच्या निमित्ताने फराज शहा-अली यांचा गीत-गायन कार्यक्रम, अश्मीक कामठे व कमल आनंद ग्रुपचा, ‘वारसा माझ्या कल्पनेचा’ हा कार्यक्रम, ओंकार कोळपकर यांनी विनोदी नाट्य, अरुणा सेल्वराज यांनी गायन, नुपुर स्कूल आॅफ डान्स व नृत्यालय आर्ट अॅण्ड कल्चर वेल्फेअर असोसिएशन यांनी नृत्याचे सादरीकरण केले. या कार्यक्र माला ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, आमदार मंदा म्हात्रे, व्ही.टू. सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक राज ठक्कर, एचएफएफचे संचालक जाफर पिरजादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे, अभिनेता संतोष जुवेकर, हेमांगी कवी, प्रसाद कांबळी, गायक मंगेश बोरगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. अधिक वृत्त/पान ६
नवी मुंबई अभिमान पुरस्काराने सन्मानित मान्यवर व संस्था
आमदार मंदा म्हात्रे, शोभा मूर्ती, प्रीती सिंग रंगा,
डॉ. एस. पी. किंजवडेकर, आबा रणवरे, ललित पाठक, जगदीश जाधव, धनंजय वनमाळी, डॉ. प्रवीण गायकवाड, सुभाष कुलकर्णी, डॉ. रिचा भार्गव, अलंक्रि त राठोड, गोपीनाथ देवकर, डॉ. आर. एन. पाटील, शिमोना भन्साली, सिंधू नायर, अंशुल शर्मा,बी पी मरिन अॅकॅडमी, एमजीएम हॉस्पिटल, सेंट विल्फ्र ड ट्रस्ट