नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

By नामदेव मोरे | Published: February 1, 2023 12:16 PM2023-02-01T12:16:34+5:302023-02-01T12:17:03+5:30

Navi Mumbai : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत.

Navi Mumbai became a city of parks | नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

googlenewsNext

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत. ११६ मोकळ्या जागांवर हिरवळ विकसित केली असून, २२ ट्री बेल्ट तयार केले आहेत. १३ लाख ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा विकास करण्यात आला असून, उद्यानांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी जॉगिंग  ट्रॅक व खुल्या व्यायामशाळाही सुरू केल्या आहेत. 

देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. सर्वोत्तम शहराच्या मानांकनामध्ये वाढ व्हावी व राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने नागरी सुविधाही दर्जेदार मिळतील याकडे लक्ष दिले आहे. रस्ते, गटार, पाणी या मूलभूत सुविधांसह शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी प्रत्येक विभागात चांगली उद्याने विकसित करण्यावर भर दिला आहे. ८ लाख ८३ हजार  चौरस मीटर क्षेत्रफळ जमीन उद्यानांनी व्यापली आहे.  यामध्ये नेरूळमधील वंडर्स पार्क, रॉक गार्डन, वाशीमधील मिनी सिशोर परिसरातील उद्याने, घणसोलीमधील सेंट्रल पार्क, कोपरखैरणेमधील निसर्ग उद्यानांसारख्या मोठ्या उद्यानांचाही समावेश आहे. 

शहरातील उद्यानांचा तपशील 
    विभाग    उद्याने    क्षेत्रफळ (चौ.मी.) 
    सीबीडी    ४१    २७१६६४ 
    नेरूळ    ३६    १५८१२० 
    तुर्भे, सानपाडा    १४    ८९७२६ 
    वाशी    ३३    १४८४५६ 
    कोपरखैरणे    २०    ५७३८५ 
    घणसोली    १०        २०३६३ 
    ऐरोली    २७    १३१९४९ 
    दिघा    १     ५६०० 

मोकळ्या जागेत हिरवळ विकसित केलेली क्षेत्रे
    विभाग    उद्याने    क्षेत्रफळ (चौ.मी.) 
    सीबीडी    ३३         ५८७६७ 
    नेरूळ    ११         १८००० 
    तुर्भे, सानपाडा    ९        १०६४५ 
    वाशी    १५        २४७०८ 
    कोपरखैरणे    १०        २३६७४ 
    घणसोली    ६        ९९४६ 
    ऐरोली    १०        १५३७८ 
पामबीच रस्ता    १०    १०९९७० 
ठाणे बेलापूर रस्ता    १२        ७८४३६ 

बक्षिसाच्या रकमेतून फुलविले उद्यान 
राज्य सरकारने राबविलेल्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने पहिल्या क्रमांक मिळविला होता. शासनाने दिलेल्या बक्षिसाच्या पैशांमधून नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर रॉक गार्डन अर्थात संत गाडगेबाबा उद्यानाची निर्मिती केली आहे. स्वच्छतेच्या पैशातून उभारण्यात आलेले देशातील हे एकमेव उद्यान आहे.

डम्पिंग ग्राऊंडवर मियावाकी जंगल 
n नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले डम्पिंग ग्राऊंड कोपरखैरणे येथे होते. 
n डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर तेथील जागेवर निसर्ग उद्यान फुलविण्यात आले आहे. 
n तेथे मियावाकी पद्धतीचे जंगल तयार केले असून जॉगिंग ट्रॅकही विकसित केले आहे.

जिथे जागा उपलब्ध होईल तेथे उद्यानांची निर्मिती केली असून उद्याने कमी असलेल्या परिसरात नवीन भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्यानांबरोबर मोकळ्या जागांचेही सुशोभीकरण केले जाते.
११६ मोकळ्या भूखंडांवर हिरवळ विकसित केली आहे. विकसित केलेल्या मोकळ्या जागांचे क्षेत्रफळ 
३.४९ लाख एवढे आहे. यामध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडसह विविध रोडच्या कडेलाही वृक्षांची लागवड केली आहे. दुभाजकांमध्ये हिरवळ विकसित केली आहे. २२ ट्रील बेल्ट व १५ सर्कल विकसित केले आहेत. 

Web Title: Navi Mumbai became a city of parks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.