शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

नवी मुंबई बनले उद्यानांचे शहर

By नामदेव मोरे | Published: February 01, 2023 12:16 PM

Navi Mumbai : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत.

- नामदेव मोरे नवी मुंबई : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत. ११६ मोकळ्या जागांवर हिरवळ विकसित केली असून, २२ ट्री बेल्ट तयार केले आहेत. १३ लाख ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा विकास करण्यात आला असून, उद्यानांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी जॉगिंग  ट्रॅक व खुल्या व्यायामशाळाही सुरू केल्या आहेत. 

देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. सर्वोत्तम शहराच्या मानांकनामध्ये वाढ व्हावी व राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने नागरी सुविधाही दर्जेदार मिळतील याकडे लक्ष दिले आहे. रस्ते, गटार, पाणी या मूलभूत सुविधांसह शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी प्रत्येक विभागात चांगली उद्याने विकसित करण्यावर भर दिला आहे. ८ लाख ८३ हजार  चौरस मीटर क्षेत्रफळ जमीन उद्यानांनी व्यापली आहे.  यामध्ये नेरूळमधील वंडर्स पार्क, रॉक गार्डन, वाशीमधील मिनी सिशोर परिसरातील उद्याने, घणसोलीमधील सेंट्रल पार्क, कोपरखैरणेमधील निसर्ग उद्यानांसारख्या मोठ्या उद्यानांचाही समावेश आहे. 

शहरातील उद्यानांचा तपशील     विभाग    उद्याने    क्षेत्रफळ (चौ.मी.)     सीबीडी    ४१    २७१६६४     नेरूळ    ३६    १५८१२०     तुर्भे, सानपाडा    १४    ८९७२६     वाशी    ३३    १४८४५६     कोपरखैरणे    २०    ५७३८५     घणसोली    १०        २०३६३     ऐरोली    २७    १३१९४९     दिघा    १     ५६०० 

मोकळ्या जागेत हिरवळ विकसित केलेली क्षेत्रे    विभाग    उद्याने    क्षेत्रफळ (चौ.मी.)     सीबीडी    ३३         ५८७६७     नेरूळ    ११         १८०००     तुर्भे, सानपाडा    ९        १०६४५     वाशी    १५        २४७०८     कोपरखैरणे    १०        २३६७४     घणसोली    ६        ९९४६     ऐरोली    १०        १५३७८ पामबीच रस्ता    १०    १०९९७० ठाणे बेलापूर रस्ता    १२        ७८४३६ 

बक्षिसाच्या रकमेतून फुलविले उद्यान राज्य सरकारने राबविलेल्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने पहिल्या क्रमांक मिळविला होता. शासनाने दिलेल्या बक्षिसाच्या पैशांमधून नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर रॉक गार्डन अर्थात संत गाडगेबाबा उद्यानाची निर्मिती केली आहे. स्वच्छतेच्या पैशातून उभारण्यात आलेले देशातील हे एकमेव उद्यान आहे.

डम्पिंग ग्राऊंडवर मियावाकी जंगल n नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिले डम्पिंग ग्राऊंड कोपरखैरणे येथे होते. n डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर तेथील जागेवर निसर्ग उद्यान फुलविण्यात आले आहे. n तेथे मियावाकी पद्धतीचे जंगल तयार केले असून जॉगिंग ट्रॅकही विकसित केले आहे.

जिथे जागा उपलब्ध होईल तेथे उद्यानांची निर्मिती केली असून उद्याने कमी असलेल्या परिसरात नवीन भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्यानांबरोबर मोकळ्या जागांचेही सुशोभीकरण केले जाते.११६ मोकळ्या भूखंडांवर हिरवळ विकसित केली आहे. विकसित केलेल्या मोकळ्या जागांचे क्षेत्रफळ ३.४९ लाख एवढे आहे. यामध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबईसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडसह विविध रोडच्या कडेलाही वृक्षांची लागवड केली आहे. दुभाजकांमध्ये हिरवळ विकसित केली आहे. २२ ट्रील बेल्ट व १५ सर्कल विकसित केले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई