नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:12 AM2023-02-18T10:12:00+5:302023-02-18T10:12:21+5:30

४,९२५ कोटींच्या अर्थसंकल्पात सर्वांगीण विकासावर भर

Navi Mumbai became debt free, priority for income growth | नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

नवी मुंबई झाली कर्जमुक्त, उत्पन्नवाढीला प्राधान्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चा ४,९२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी  सादर केला. सर्वांगीण विकासावर भर देताना वास्तववादी योजनांना प्राधान्य दिले आहे. यंदाही शहरवासीयांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

उड्डाणपूल, स्मार्ट पार्किंग, आरोग्यसुविधा, स्वच्छता अभियानासह शहर सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे. महानगरपालिकेच्या विशेष सभागृहात राजेश नार्वेकर यांनी पुढील वर्षभरातील जमा-खर्चाचा ताळेबंद सादर केला. यात १,१४५ कोटी रुपयांची आरंभीची शिल्लक आहे. स्वच्छता अभियानावर मनपाने देशपातळीवर ठसा उमटविला असून यावर्षी देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी अर्थसंकल्पातही शहर स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सुशोभीकरण यावर भर दिला आहे. ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ येथे नवीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे.

स्मार्ट व बहुमजली पार्किंग,  वैद्यकीय महाविद्यालय होणार
n नवी मुंबईमध्ये स्मार्ट व बहुमजली पार्किंगची योजना राबविली जाणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. 
n आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात डबल डेकर बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  शहरात १५०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्प राबविला जाणार आहे.

नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देताना वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला आहे. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून कोणतेही कर्ज नाही. यामुळे यावर्षीही कोणतीच करवाढ केलेली नाही. सर्वोत्तम पायाभूत सुविधांसह पर्यावरण रक्षण, आरोग्य व शहर सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे.
- राजेश नार्वेकर, 
आयुक्त महानगरपालिका. 

Web Title: Navi Mumbai became debt free, priority for income growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.