नवी मुंबई : ख्रिसमसच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:11 AM2017-12-19T02:11:11+5:302017-12-19T02:11:28+5:30

अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, सिरॅमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, स्नोमॅन, सोनेरी रंगांच्या घंट्याची माळ, एन्जल्स, चांदण्यांचे कंदील, शुभेच्छा कार्ड, सांताक्लॉजची टोपी-हेअरबँड, कपडे, चॉकलेट बॉक्स, ड्रम, मोजे आदी सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे.

Navi Mumbai: A big crowd in the city's markets to buy Christmas | नवी मुंबई : ख्रिसमसच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी

नवी मुंबई : ख्रिसमसच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी

Next

नवी मुंबई : अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी लागणारे साहित्य तसेच सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, सिरॅमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, स्नोमॅन, सोनेरी रंगांच्या घंट्याची माळ, एन्जल्स, चांदण्यांचे कंदील, शुभेच्छा कार्ड, सांताक्लॉजची टोपी-हेअरबँड, कपडे, चॉकलेट बॉक्स, ड्रम, मोजे आदी सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. एपीएमसी मार्केट, वाशी सेक्टर ९, सीबीडी सेक्टर ४, नेरुळ, सानपाडा आदी परिसरांमधील दुकाने सजविण्यात आली आहेत.
ख्रिसमस सणानिमित्त बाजारात दाखल झालेले सजावटीचे साहित्य, भेटवस्तूंनी नवी मुंबईकरांना या सणाची चाहूल लागली आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा तयार करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसत आहे. बाजारात येशू ख्रिस्तांच्या जन्माचे रेडिमेड देखावेही मिळत असल्याने अनेक ग्राहक या देखाव्यांना पसंती देत असल्याचे बाजारपेठेतील एका विक्रे त्याने सांगितले. २०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे देखावे बाजारात उपलब्ध आहेत. अगदी ५०ते १०० रु पयांपासून ते हजार रु पयांपर्यंत सजावटीच्या साहित्यांची किंमत आहे. सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, कापडी हेअर बँड ४० ते ६० रु पयांपर्यंत मिळत आहेत. ख्रिसमस ट्री ७० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. जपानी चेन ३० ते ६०रुपये, शोभिवंत माळा ३० ते १०० रुपये, मोठ्या आकारातील बेल १२० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.ख्रिस्ती बांधवांच्या घरी फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. फराळासाठी लागणारे विविध पदार्थ खरेदी केले जात आहेत. आदल्या दिवशी ख्रिसमस इव्ह असतो त्यावेळी नटूनथटून जाण्यासाठी कपड्यांच्या खरेदीला ऊत आला आहे.
ख्रिसमस स्पेशल मेणबत्त्या आणि डिझाईनर बेल्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आठवडाभरापासूनच ख्रिश्चनधर्मियांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्यामध्ये सॅँटाच्या पायातील बुटांचा संच असलेली तोरणे, गिफ्ट्सचे बॉक्स गुंफून तयार केलेली तोरणे आहेत. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस पार्टीमध्ये डोक्यात घालण्यासाठी सॅँटाच्या डोक्यातील लाल टोप्या बाजारात आलेल्या आहेत. गेल्या वर्षी नोटाबंदीचा परिणाम खरेदीवर झाला होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ख्रिसमससाठी लागणारे साहित्य तसेच कापड बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात माल विकला जात असल्याचा आनंद दुकानदारांनी व्यक्त केला आहे.
ख्रिसमस कॅरल स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी-
वाशीतील सेंट लॉरेन्स हायस्कूल येथे ख्रिसमसनिमित्त कॅरल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खास नाताळसाठी भक्तिगीते रचली जातात, त्यांना ख्रिसमस कॅरल म्हटले जाते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली गाणी सादर केली. नवी मुंबईतील रायन ग्रुपच्या शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ५०० हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. सेंट लॉरेन्स स्कूल वाशी यांनी या स्पर्धेत बाजी मारली तर उत्तेजनार्थमध्ये पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूलच्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक आणि सेंट झेवियर्स हायस्कूलला द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळविले. यावेळी विद्यार्थ्यांकरिता ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे खास आकर्षण असलेल्या सांताक्लॉजने देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Navi Mumbai: A big crowd in the city's markets to buy Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.