शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

नवी मुंबईकरांना प्रतीक्षा मेट्रोची !

By admin | Published: June 08, 2015 3:57 AM

माहिती व तंत्रज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या नवी मुंबईच्या लौकिकात आता मेट्रोची भर पडणार आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबईमाहिती व तंत्रज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या नवी मुंबईच्या लौकिकात आता मेट्रोची भर पडणार आहे. जलदगती वाहतुकीचा सक्षम पर्याय म्हणून सिडकोने शहरात मेट्रोचे जाळे विनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेलापूर ते पेंधरदरम्यान ११ कि़मी़ लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. विविध कारणांमुळे संथगतीने सुरू असलेल्या या मार्गावर डिसेंबर २0१६पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर उद्योग-व्यवसायातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या घटकांचे प्रमाण वेगाने घटत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर ही बाब शोभनीय नसल्याने सिडकोने पारंपरिक रस्ते वाहतुकीला सक्षम ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेला पसंती दिली आहे. त्यानुसार १0६.४0 कि़मी़ लांबीचा मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. बेलापूर ते पेंधर या ११ कि़मी़च्या मार्गावर एकूण ११ स्थानके असणार आहेत. मात्र विविध कारणांमुळे हे काम रखडल्याने या प्रकल्पाचा खर्च १,९८५ कोटींवरून २,१११ कोटींवर गेला आहे. ही मेट्रोची सेवा प्रत्यक्ष २0१७ पर्यंत सुरू होईल असे सांगण्यात येते. ७0 टक्के काम पूर्णबेलापूर ते पेंधरदरम्यानच्या मार्गावर एकूण ११ स्थानके असणार आहेत. सीबीडी बेलापूर व पेंधर येथे टर्मिनल असणार आहेत. सध्या या मार्गाचे काम ७0 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. पाच मार्गिकांची आखणीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सध्या शहरात उपनगरीय रेल्वे आणि नागरी वाहतूक सेवा कार्यान्वित आहे. विमानतळामुळे या यंत्रणांवर ताण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नोड्स जोडण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी एकूण पाच मार्गिकांची आखणी करण्यात आली आहे. बेलापूर-तळोजा-खांदेश्वर व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या पहिल्या मार्गिकेची लांबी २३.४0 कि़मी़ इतकी आहे. बेलापूर ते तळोजा, पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. उर्वरित एमआयडीसी ते खांदेश्वर दुसरा, तर पेंधर व एमआयडीसीला जोडणार तिसरा अशा तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली.