नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध
By कमलाकर कांबळे | Published: August 30, 2022 11:58 PM2022-08-30T23:58:27+5:302022-08-30T23:58:59+5:30
अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते
कमलाकर कांबळे
नवी मुंबई: गणेश चतुर्थीच्या मुहर्तावर सिडकोने चार हजार घरांची योजना आणली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे असून अल्प आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या घरांचा लाभ घेता येणार आहे. तळोजा, कळंबोली, खारघर आणि द्रोणागिरी या नोडमध्ये ही घरे आहेत. विशेष म्हणजे ही सर्व घरे यापूर्वीच्या विविध गृहयोजनांतील शिल्लक राहिलेली आहेत. सिडकोच्या नव्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. परंतु विविध कारणांमुळे ही सोडत लांबणीवर पडली होती.
अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते. परंतु हा मुहर्तही हुकल्याने ग्राहकांची निराशा झाली होती. असे असले तरी गणेश चतुर्थीच्या मुहर्तावर म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शिल्लक असलेल्या चार हजार घरांची योजना सिडकोने आणली आहे. याच मुहर्तावर भूखंड विक्रीची योजना सुध्दा जाहिर केली जाणार आहे. यात नवी मुंबईच्या विविध भागातील ६४ लहान मोठ्या भूखंडांचा समावेश आहे. वाणिज्यिक आणि निवासी वापराचे हे भूखंड आहेत.