बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:13 PM2024-06-03T13:13:39+5:302024-06-03T13:18:41+5:30
नवी मुंबईत बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या भावाने आणि वडिलांनी त्याची हत्या केली आहे.
Navi Mumbai Crime :नवी मुंबईतून एका १८ वर्षीय मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईपोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही पिता पुत्र आहेत. घरात बहिणीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बाप लेकाने १८ वर्षीय मुलाची हत्या केली. या सगळ्या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.
वडिलांसोबत मिळून भावाने बहिणीच्या १८ वर्षीय प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील टाऊनशिप येथे घडला. रविवारी दुपारच्या सुमारास आरोपीच्या बहिणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र भाऊ आणि वडिलांना हा प्रकार समजात त्यांनी १८ वर्षीय तरुणाच निर्घृणपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली.
समीर अब्दुल शेख (१८) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. समीरच्या मैत्रिणीने त्याला रविवारी दुपारी तरुणीने पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. मात्र त्याचवेळी तरुणीचा भाऊ कामावरून लवकर घरी पोहोचला. त्याने दरवाजा ठोठावला असता त्याच्या बहिणीने तो उघडला नाही. आरोपीने दरवाजा तोडला असता त्याला त्याची बहीण प्रियकर समीर अब्दुल शेख (१८) याच्यासोबत सापडली. त्याचवेळी आरोपी भावाने याने तात्काळ वडिलांना फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी घरातील लोखंडी फावडे व कुऱ्हाडीने वार करत समीर शेखचा खून केला. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाला.
Navi Mumbai: Police arrested a 24-year-old man, who along with his father killed his sister's 18-year-old friend. The incident happened on Sunday afternoon when the accused's sister called her friend, to her house. The accused reached home early from work. When he knocked on the…
— ANI (@ANI) June 3, 2024
माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंडसहिता ३०२ आणि ३४ अंतर्गंत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
वाढदिवसाचा केक उशीरा आणल्याने पत्नी, मुलावर चाकूने हल्ला
मुंबईच्या साकीनाका परिसरात वाढदिवसाचा केक उशीरा आणल्यामुळे ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी व मुलावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदेविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी पत्नी व मुलावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.