शेअर्समध्ये तोटा झाल्यास करायचा छळ, नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 04:46 PM2024-05-12T16:46:18+5:302024-05-12T16:46:29+5:30
नवी मुंबई एका पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने रोजच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे.
Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या खारघर परिसरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या ३१ वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खारघर पोलीसांनी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आठ दिवसांनी गुन्हा दाखल झाला.
खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ मधील इनोव्हेटीव्ह हाईट्स या इमारतीमध्ये ११०२ क्रमांकाच्या घरात अर्चना व आमोध सिंग हे दाम्पत्य राहत होते. आमोध सिंग हा सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. आमोधसोबत अर्चनाचे ३० नोव्हेंबर २०१४ रोजी शी लग्न झाले होता. या जोडप्याला ७ आणि ३ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र आमोदच्या छळाला कंटाळून ३ मे रोजी अर्चनाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.
अर्चना यांच्या भाऊ अमनकुमार याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सासरहून हुंड्यासाठी छळ सुरु होता. आमोध पत्नीला मारहाण करायचा आणि आई-वडिलांकडे पैसे मागायचा. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीच्या सांगण्यावरून शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते. पण तोटा झाल्यास तो तिला दोष देत असे. आमोधला पत्नीच्या नावावर असलेली जमीन आणि बँक खाती त्याच्या नावावर आणि कुटुंबीयांच्या नावे करायची होती. त्याने तिला घटस्फोट देण्याची धमकीही दिली होती.
३ मे २०२४ रोजी अर्चनाने कथितरित्या तिच्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अर्चनाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, शुक्रवारी कलम ३०६,३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.