नवी मुंबई : भटक्या कुत्र्यांची दहशत, कारवाईकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:34 AM2018-02-12T01:34:44+5:302018-02-12T01:35:04+5:30
भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या काही वर्षांत सार्वत्रिक बनली आहे. कुत्र्यांची दहशत वाढली असून झुंडीने एकट्या-दुकट्या माणसांच्या, मुलांच्या अंगावर धावून येऊ लागले आहेत, त्यांच्यावर हल्ले करू लागले आहेत.
नवी मुंबई : भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या काही वर्षांत सार्वत्रिक बनली आहे. कुत्र्यांची दहशत वाढली असून झुंडीने एकट्या-दुकट्या माणसांच्या, मुलांच्या अंगावर धावून येऊ लागले आहेत, त्यांच्यावर हल्ले करू लागले आहेत. चावून त्यांचे लचके तोडू लागले आहेत. शहरात ठिकठिकाणी नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या कुत्र्यांविषयी पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वाहनांच्या मागे धावत हल्ला करण्याचे प्रमाणही वाढले आहे. महानगरपालिका कुत्र्यांच्या दहशतीकडे गांभीर्याने लक्ष घालत नसून, गेल्या आठवडाभरात सीबीडी बेलापूर परिसरातील सहा व्यक्तींना कुत्रा चावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर महापालिकेने दुर्लक्ष केल्याने वर्षभरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ‘पेटा’ या प्राणिमित्र संस्थेने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाकडून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा पर्याय पुढे आला. त्यानंतर महापालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली; पण महापालिकेने या योजनेबाबत कधीच फारसा रस दाखवला नाही. परिणामी, कुत्र्यांची संख्या वाढतच गेली आहे.
कुत्र्याच्या दंशानंतर आवश्यक असलेल्या अँटी रेबिज लसीचाही काही वेळा तुटवडा भासतो, अशीही नागरिकांची तक्र ार असते. अर्थात ही लस नेहमी उपलब्ध असते, असा महापालिकेचा दावा आहे; पण ही लस घेण्याची वेळच नागरिकांवर येता कामा नये, अशी प्रतिक्रिया रहिवासी विजय सावंत यांनी केली आहे. गेल्या आठवड्यातच श्वानदंशाने सावंत यांना लस घ्यावी लागली. सीबीडीतील कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शाळकरी मुलांना एकटे सोडणे मुश्कील झाल्याची तक्रार सावंत यांनी केली.
श्वानमालकांवरही कारवाईची मागणी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छ नवी मुंबई मिशन प्रभावीपणे राबवले जात आहे. नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि हागणदारीमुक्त करण्याकडे गतिमान वाटचाल केली जात आहे. पाळीव श्वानाच्या मलामुळे अस्वच्छता करणाºया मालकांवर ठोस कारवाई होत नसल्याने ते निर्भयपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येते. अस्वच्छता फै लविणाºया श्वानमालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया श्वानमालकांवर दंडात्मक कारवाई केली जावी, अशीही मागणी ज्येष्ठांच्या वतीने करण्यात आली आहे.