Navi Mumbai: तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:54 PM2023-04-30T12:54:37+5:302023-04-30T12:56:54+5:30
Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे.
तळोजा सेक्टर २ मधील श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये राहणारा बोनिफेस ईमेनीके राहणारा नायजेरीयन नागरिक अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या इमारतीमध्ये छापा टाकला व पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोनिफेसला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता खिशामध्ये ११६ ग्रॅम वजनाचे मेथाक्युलॉन अमली पदार्थ आढळून आला असून त्याची किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. या व्यतिरिक्त वजन काटा, मोबाईल व रोख रक्कमही हस्तगत केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (सी) , २२(बी) सह पारपत्र अधिनयम १९५० च्या कलम ३ व ६, परदेशी नागरिक कायदा कलम १४ (अ)(ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.