नवी मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:33 PM2023-03-29T15:33:47+5:302023-03-29T15:35:37+5:30

वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे.

Navi Mumbai: Electricity bill payment centers of Mahavitran will remain open on holidays | नवी मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

नवी मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

googlenewsNext

नवी मुंबई : राज्यातील वीजग्राहकांची थकबाकी दिवसांदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे, वीज बिल वसुली करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून, ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शुक्रवार राम नवमी, शनिवार व रविवारी भांडूप परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.

सध्या, भांडुप परिमंडळात वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. याशिवाय, तात्पुरता व कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज जोडणीची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनधिकृतपणे वीज वापरत असलेल्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. म्हणून, ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे वीजेचा वापर करावा व आपले वीजबिल नियमितपणे भरावे असे आवाहन भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी ग्राहकांना केले आहे.

तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी भांडुप परिमंडळातील सर्व वीजबिल भरणा केंद्र शुक्रवारी राम नवमीच्या दिवशी तसेच  शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. वीज ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in अथवा महावितरणच्या मोबाईल ॲप अशा ऑनलाईन माध्यमातून ही घरबसल्या वीजबिल भरू शकतात असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Navi Mumbai: Electricity bill payment centers of Mahavitran will remain open on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.