शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

नवी मुंबई : शहरात दररोज १००० किलो गुटखा विक्री, तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:54 AM

गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.नवी मुंबई व पनवेलमधील ५ हजारपेक्षा पानटपरी व किराणा दुकाने व छोट्या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे गुटखा विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ, कांदा, बटाटा,मसाला व धान्य मार्केटमधील प्रत्येक पानटपरीवर सर्वांना दिसतील अशाप्रकारे गुटख्याच्या माळा लावून ठेवण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील विक्रेत्यांना गुटखा बंदीविषयी विचारले असता बंदी असली तरी सर्वत्र गुटखा मिळतो. पोलीस, एपीएमसी, एफडीएवाल्यांना खूश केले की कोणी कारवाई करत नसल्याचे सांगण्यात आले. सर्वांची परवानगी असल्यामुळेच गुटखा विकता येत असल्याचे उत्तर देण्यात आले. बाजार समितीमधील कामगार, व्यापारी व इतर घटकांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले असून त्यांना प्रत्येक पानटपरीवर सहजपणे हवा त्या ब्रँडचा गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे.महाराष्ट्रामध्ये गुजरातवरून गुटखा विक्रीसाठी येत आहे. अहमदाबादमध्ये उत्पादन होत असलेल्या विमल गुटख्याची सर्वत्र चलती आहे. पाच रुपयांची विमलची पुडी ८ रुपयांना व १० रुपये किमतीची पुडी १५ रुपयांना विकली जात आहे. गोवा, राज कोल्हापुरी, सागर व इतर कंपनीचा गुटखाही सर्व पानटपरीवर विकला जात आहे. यावर त्याचे उत्पादन कुठे होते याची काहीही माहिती दिलेली नाही. आरएमडी गुटखा सर्वात महाग असून एका पुडीसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. गुजरातमधील अहमदाबादमधील बडोदा शहरात याची निर्मिती होत असून फक्त निर्यातीसाठी उत्पादित केला जाणारा हा गुटखा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकला जात आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया गुटखा व्यवसायामध्ये माफियांचा समावेश आहे. गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यांच्यावर पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महापालिका व इतर कोणीही कारवाई करत नसल्याने त्यांचेच अभय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.१५ टपºयांची मालकीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुन्ना, राकेश, राजाबाबू, दीपक हे चार जण पानटपºयांना गुटखा पुरविण्याचा व्यवसाय करत होते. या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमविले आहेत. सद्यस्थितीमध्ये भाजी व फळ मार्केटमध्ये तब्बल १५ टपºया त्यांनी विकत घेतल्या आहेत. या टपºया परप्रांतीयांना चालविण्यास दिल्या असून त्यामधून रोज हजारो रुपयांची उलाढाल सुरू आहे. एपीएमसीच्या बाहेरही हे वितरक गुटखा पुरवत असून त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.पदपथावरही पानटपºयाएपीएमसीच्या भाजी मार्केटपासून विस्तारित मार्केटकडे जाणाºया रोडच्या सुरवातीला अनधिकृतपणे पानटपरी उभारण्यात आली आहे. याठिकाणी गुटखा विक्रीपासून खाद्यपदार्थ विक्रीही सुरू आहे. भाजी मार्केटच्या जावक गेटच्या बाहेरही पदपथावर पानटपरी सुरू केली आहे. फळ मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या गेटवरही पानटपरी सुरू असून सर्व ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणीही कारवाई करत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई