नवी मुंबई स्वच्छतेत पहिली येण्याची अपेक्षा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:44 PM2020-12-31T23:44:37+5:302020-12-31T23:44:43+5:30
शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते.
नामदेव माेरे
नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईला देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. शहराला पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. यामुळे अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.
शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते. काेणती विकासकामे व्हावी याविषयी अपेक्षाही व्यक्त केल्या जात असतात. या अपेक्षा सार्थ असल्या तरी या वेळी मात्र पालिकेने व लाेकप्रतिनिधींनी नागरिकांकडून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा करण्यास सुरुवात केली आहे. न
वी मुंबई पालिकेने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता अभियानामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात २००२ - ०३ व २००५ - ०६ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१७ मध्ये देशात आठवा क्रमांक, २०१८ मध्ये देशात सातवा क्रमांक, २०१९ - २० मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला.