नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई उत्सवात सदाबहार गीतांसह मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याविष्कारांचा आस्वाद नवी मुंबईकरांनी घेतला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल या मैदानावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि त्यांचे सुपुत्र शिवम महादेवन यांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सदाबहार नृत्याने प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला सुरुवात झाली. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचीही या कार्यक्र माला विशेष उपस्थिती लाभली होती. पद्मश्री संगीतकार शंकर महादेवन त्यांचे सुपुत्र शिवम महादेवन यांनी आपल्या संगीत सुरांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. यासह अनेक बालकलाकारांनी आपल्या संगीतगुणांचे दर्शन या वेळी घडविले. अभिनेते सुबोध भावे यांनी या कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. हजारोंच्या संख्येने नागरिक या कार्यक्र माला उपस्थित होते. या कार्यक्र माचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मनमुराद आनंद घेतला. श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून मागील २४ वर्षांपासून अशाप्रकारे विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन केले जात असल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी या वेळी दिली. नवी मुंबई शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या शहरातील प्रकल्पग्रस्त तसेच सर्वच स्तरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी म्हात्रे या सतत कटिबद्ध असल्याची कौतुकाची थाप या वेळी मुख्यमंत्र्यांनी मंदा म्हात्रे यांना दिली. मंदा म्हो यांनी केलेल्या कार्यअहवालाचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.
नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्नांची यापूर्वीचे राजकारणी केवळ चर्चा करत होते. आमच्या सरकारने ते सोडवले आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी आपल्या कार्याचा अहवाल जनतेला द्यावा, हा रामभाऊ म्हाळगी यांनी दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवत बेलापूरच्याआमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या पाच वर्षांत केलेल्या कार्याचा अहवाल जनतेसमोर मांडत आपण जनतेच्या विश्वासाचे पाईक असल्याचेदाखवून दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कारया उत्सवात वाशी खाडीपुलावर मच्छीमारी करणारे महेश सुतार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाशी खाडीपूल येथून आत्महत्या करणाºया अनेकांचे जीव महेश यांनी वाचविले आहेत, तसेच या ठिकाणचे मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना महेश हे सतत मदत करत असल्याने त्यांचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.