नवी मुंबई - नेरुळमधील सेक्टर 44 येथील सीहोम्स इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग विझवताना सात जवान जखमी झाले असून त्यांना मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या घरात आग लागली ते घर दुर्घटनेवेळी बंद होते. आगीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पामबीचला लागून असलेल्या सीवूडस येथील इमारतीला शनिवारी (8 फेब्रुवारी) आग लागली आहे. सीहोम्स या इमारतीला आग लावली असून इमारतीच्या शेवटच्या दोन मजल्यावर म्हणजेच 20 आणि 21 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व 50 ते 60 जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम अद्यापही सुरू आहे. सकाळी सहाच्या दरम्यान ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रहिवाशांना इमारतीतून खाली आणण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन