नवी मुंबई : सिडकोचा पायलट प्रोजेक्ट म्हणून विकसित झालेल्या खारघरमध्ये आता जम्मू-काश्मीर भवन साकारणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीनुसार सिडकोने भवनसाठी भूखंड देण्याचे मान्य केले आहे. तशा आशयाच्या ठरावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या रूपाने शहरात दहावे प्रादेशिक भवन उभारले जाणार आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबईत विविध प्रांत व प्रदेशातील लोक राहतात. विभिन्न भाषा व संस्कृतीमुळे शहराला कॉस्मोपॉलिटीनचा दर्जा प्राप्त झाला आहे. शहरात राहणाºया विविध राज्यांतील लोकांना त्यांच्या संस्कृतीचा प्रचार करता यावा, यादृष्टीने सिडकोने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून वाशी रेल्वेस्थानक परिसरात विविध राज्यांच्या भवनसाठी भूखंड दिले आहेत. या भवनमध्ये त्या त्या राज्यांतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. यात खाद्य, पेहराव, कला, नृत्य, संगीत आदींचा समावेश आहे. सध्या वाशी स्थानक परिसरात उत्तरांचल, ओडिसा, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश, राजस्थान भवन, मेघालय, नागालॅण्ड आणि उत्तरप्रदेश भवनसाठी भूखंड देण्यात आले आहेत. यापैकी बहुतांशी भवन सिडकोनेच बांधून संबंधित राज्याला दिले आहेत. तर सध्या उत्तरप्रदेश भवनचे काम प्रगतिपथावर आहे. वाशी परिसरात मोकळे भूखंड शिल्लक नसल्याने जम्मू-काश्मीर राज्याला भवन निर्मितीसाठी खारघर सेक्टर १६ येथे भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सिडकोच्या माध्यमातून उभारले जाणारे शहरातील हे दहावे प्रादेशिक भवन ठरणार आहे.महाराष्ट्र भवनसाठी पाठपुरावानवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या शहराला खºया अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहेत. शहरात सध्या विविध राज्यांचे प्रादेशिक भवन आहेत; परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून विविध कामांसाठी मुंबई व आजूबाजूच्या शहरात येणाºया ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या धर्तीवर सिडकोने नवी मुंबईत महाराष्ट्र भवनची निर्मिती करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून विविध स्तरातून केली जात आहे.
नवी मुंबई : खारघरमध्ये जम्मू-काश्मीर भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:36 AM