नवी मुंबई: बडोदा बँक लुटणा-या टोळीला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:53 AM2017-12-20T01:53:17+5:302017-12-20T01:53:39+5:30
बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुन्हा उघड करून पोलिसांनी त्यांना अटक केल्यापासून ते पोलीस कोठडीत होते. त्यानुसार या अकराही जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नवी मुंबई : बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुन्हा उघड करून पोलिसांनी त्यांना अटक केल्यापासून ते पोलीस कोठडीत होते. त्यानुसार या अकराही जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
भुयार खोदून जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याची घटना गतमहिन्यात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांतच अकरा जणांना अटक केली. हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग ऊर्फ अज्जू ऊर्फ लंगडा, श्रावण हेगडे ऊर्फ संतोष कदम ऊर्फ काल्या, मोमीन खान ऊर्फ पिंटू, अंजन महांती ऊर्फ रंजन, मोईद्दीन शेख ऊर्फ मेसू, राजेंद्र वाघ, शहनाजनी शेख, कमलेश वर्मा, शुभम निशाद, जुम्मन अली अब्दुल शेख व मेहरुन्निसा मिर्झा अशी त्यांची नावे आहेत. या टोळीने देशभरात अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना केल्या आहेत. बडोदा बँक लुटीप्रकरणी त्यांच्या इतरही चौघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.