नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:51 AM2017-12-20T01:51:53+5:302017-12-20T01:52:01+5:30

पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.

Navi Mumbai: The kidnapping of a woman committed by an inter-caste love affair, she beat up her husband and beat his wife | नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

googlenewsNext

नवी मुंबई : पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.
मानखुर्द येथे राहणाºया मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरी (२८) यांंच्यासोबत हा प्रकार घडला आहे. रविवारी दुपारी ते पत्नी रेशमासोबत वाशीतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर ते रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावरून जात होते. या वेळी कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करून पत्नी रेशमा हिला पळवून नेले. याप्रकरणी पतीने तिच्या अपहरणाची तक्रार वाशी पोलिसांकडे केली आहे. शिवाय कारमधून आलेल्या तरुणांनी मारहाण करताना केलेल्या वक्तव्यावरून ते तिचे माहेरचे नातेवाईक असावेत अशी शक्यताही वर्तवली आहे. यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेऊन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. रेशमा ही मूळची बंगळुरूची असून मोहम्मद चौधरीसोबत तिची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले असता तिच्या घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. अखेर जुलै महिन्यात ती पळून मुंबईला आली असता, दोघांनी लग्न केले. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून ती पती मोहम्मद याच्यासोबत मानखुर्द येथे राहायला होती. या लग्नावरून रेशमाच्या कुटुंबासोबत मोहम्मद यांचा वाद देखील झाला होता, असेही समजते. याच कारणातून रेशमाच्या घरच्यांनीच तिला पळवल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यानुसार वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Navi Mumbai: The kidnapping of a woman committed by an inter-caste love affair, she beat up her husband and beat his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण