शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 7:10 AM

Navi Mumbai : नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला.

नवी मुंबई : विविध कारणांमुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईमेट्रोला राज्यसभा निवडणुकीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सिडकोला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे; परंतु उद्घाटनासाठी संबंधित मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने मेट्रोचा प्रवास रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यावर पडदा पडला असून, राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच बहुप्रतिक्षित मेट्रोचे उद्घाटन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते.नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा विडा उचलला. त्यानुसार मेट्रोचे रखडलेले काम पूर्ण करण्याबरोबरच त्याच्या संचालनाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली. वर्षभरात महामेट्रोने स्थापत्यविषयक कामे पूर्ण केली आहेत. विशेषत: पेंधर ते बेलापूर मार्गावरील पेंधर ते खारघर (सेंट्रल पार्क) या पाच किमी अंतरावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली रेल्वे सुरक्षा मंडळाकडूनसुद्धा नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार सिडकोनेही तयारी पूर्ण केली आहे;  परंतु उद्घाटनासाठी मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध न झाल्याने उद्घाटन रखडल्याचे बोलले जात आहे.

तारखेबाबत पाठपुरावा...    विशेष म्हणजे संबंधित मंत्र्यांची उद्घाटनासाठी तारीख मिळावी, यासाठी सिडकोकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागील महिनाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सिडकोने दोनदा वेळ मागितली आहे.     अखेर राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच मेट्रोचे उद्घाटन उरकण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMetroमेट्रो